घरमुंबईअंगणवाडी सेविकांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार

Subscribe

आपल्या अनेक आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा एल्गार पुकारत मोर्चा काढणार आहेत.

आपल्या अनेक आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा एल्गार पुकारत मोर्चा काढणार आहेत. उद्या, २६ फेब्रुवारीला राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहेत. बऱ्याच वेळा मोर्चे, आंदोलनं करुनही अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही. त्यामुळे, पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांकडून आंदोलनाची भूमिका घेत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

आश्वासनाची पूर्तता नाहीच

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी ११ सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा टीव्हीवरुन केली होती. याशिवाय या सेविकांच्या मानधनात करण्यात आलेली ही वाढ महिन्याभरात लागू होईल, असं आश्वासनंही दिलं. पण, अद्यापही महाराष्ट्र सरकारकडून या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती’ने पुन्हा एकदा मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मानाधनातील वाढीसोबत अंगणवाडी सेविकांच्या इतरही मागण्या आहेत. याबाबत सातत्याने पाठपुरवठा करूनही सरकार याकडे लक्ष देत नसल्याने अंगणवाडी सेविका मंत्रालयावर धडकणार आहेत.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या 

  • मानधनात वाढ करा
  • सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्या
  • सेवासमाप्ती लाभाच्या रकमेत तीनपटीनं वाढ करा
  • कर्मचाऱ्यांना मासिक पाच हजार रुपये पेंशन योजना लागू करा
  • अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी रजिस्टर आणि अहवाल फॉर्म द्या
  • वर्षातून १५ दिवसांची आजारपणासाठी भरपगारी रजा
  • अंगणवाडी सेविकांची त्यांच्या इच्छेनुसार आवश्यक ठिकाणी रिक्त जागी बदली करा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -