घरमुंबईवाड्यातील चिमुकल्यांचा अनोखा थर्टी फर्स्ट; कचर्‍यापासून साकारले प्राणी

वाड्यातील चिमुकल्यांचा अनोखा थर्टी फर्स्ट; कचर्‍यापासून साकारले प्राणी

Subscribe

वाड्यातील चिमुकल्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करुन शोभिवंत वन्यप्राणी साकारले आहेत.

टाकाऊ वस्तूंचा वापर करून शोभिवंत वन्यप्राणी बनवण्याचा उपक्रम तालुक्यातील गोराड येथील कलाकार फाउंडेशनचे महेश काचरे यांनी हाती घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून गोराड येथील शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गावभर फिरून गावातील कचर्‍यातून प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, पुठ्ठे, थर्माकोल आदी टाकाऊ वस्तू गोळा केल्या. त्यानंतर काचरे यांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली विविध वन्यप्राण्यांच्या सुबक कलाकृती बनवल्या आहेत.

- Advertisement -

टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या या वस्तू खरोखरच सुंदर आणि शोभिवंत असून पालकांकडूनही या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी कलाकार फाउंडेशनचे सदस्य भावेश काचरे, रामू बेंदर,पुंडलिक सातवी, सनी सोनावणे, मनोज बुंधे, जयेश कदम सुदाम काचरे, संजना काळभोर, संदिप पोफाले, निता जोशी, रसिका म्हस्के यांनी सहकार्य केले आहे.

आदिवासी भागातील गरजू मुलांना कला शिक्षक नसल्यामुळे त्यांच्यातील कला, प्रतिभा वाया जावू, नये म्हणून मला वेळ मिळेल तसा स्वखर्चाने मुलांना ही कला शिकवून त्यांच्यातील लपलेले सुप्त कलागुण बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे वेगवेगळ्या उपक्रमांसाठी मला आर्थिक कमतरतेला सामोरे जावे लागत आहे. यासाठी जर आर्थिक पाठबळ मिळाले तर ही कला जास्तीत जास्त विद्यार्थांना शिकवण्याचा माझा मानस आहे. – महेश काचरे, संचालक, कलाकार फाउंडेशन.

- Advertisement -

हेही वाचा – टीव्ही इंडस्ट्रीत ‘या’ दोघांच्या अफेअरची चर्चा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -