घरमुंबईसांताक्रूझमधील जागेवरून अंजली दमानियांचे समीर भुजबळांना प्रत्युत्तर; म्हणाल्या - "सुपारीबाज लोक..."

सांताक्रूझमधील जागेवरून अंजली दमानियांचे समीर भुजबळांना प्रत्युत्तर; म्हणाल्या – “सुपारीबाज लोक…”

Subscribe

सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्थिक घोटाळ्यांना लोकांसमोर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या पुन्हा भुजबळांच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. भुजबळांनी फर्नांडिस नावाच्या कुटुंबाला फसवून त्यांची जागा स्वतःच्या नावे करून घेतली आणि त्यांना एकही रुपया दिला नाही, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

मुंबई : सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्थिक घोटाळ्यांना लोकांसमोर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या पुन्हा भुजबळांच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. शुक्रवारी (ता. 17 नोव्हेंबर) जालन्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेत छगन भुजबळांनी भाषण केल्यानंतर अंजली दमानिया यांनी त्यांचे सांताक्रूझमधील जागेचे प्रकरण बाहेर काढले. भुजबळांनी फर्नांडिस नावाच्या कुटुंबाला फसवून ही जागा स्वतःच्या नावे करून घेतली आणि त्यांना एकही रुपया दिला नाही, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. परंतु. त्यांच्या या आरोपांना छगन भुजबळ यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. दमानिया या आमच्याविरोधात कारस्थान रचत आहेत, असा आरोप समीर भुजबळांकडून करण्यात आला होता. त्यांच्या या आरोपांना पुन्हा अंजली दमानिया यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (Anjali Damania’s reply to Sameer Bhujbal)

हेही वाचा – राष्ट्रवादी कोणाची ? अन्यायाविरुद्ध लढत आहे, अजित पवार गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र – अभिषेक मनू सिंघवी

- Advertisement -

आज (ता. 20 नोव्हेंबर) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, मुंबईच्या सांताक्रूझ पश्चिम येथील मंत्री छगन भुजबळ यांची इमारत ही फर्नांडीस यांच्या कुटुंबाच्या जागेवर उभी आहे. छगन भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबाचे घर लुटले आहे. भुजबळांच्या इमारतीच्या ठिकाणी 1994 मध्ये फर्नांडिस यांचा बंगला होता. तो बंगला फर्नांडिस कुटुंबाने पुनर्विकासासाठी रहेजा यांना दिला. या बंगल्याच्याऐवजी फर्नांडिस यांच्या कुटुंबाला 5 फ्लॅट मिळणार होते. पण त्यांना ते मिळाले नाहीत. तसेच फर्नांडिस कुटुंबाची जागा समीर भुजबळ यांच्या परवेज कन्स्ट्रक्शनला परस्पर विकला गेला, असा दावाही दमानिया यांच्याकडून करण्यात आला. फर्नांडिस कुटुंबाने अनेकदा समीर भुजबळांची भेट घेतली. पण फर्नांडिस कुटुंबाला एक रुपयाही परतफेड देण्यात आली नाही, अशी माहितीही अंजली दमानिया यांनी दिली.

तसेच, परवेश कंपनी ही समीर भुजबळांची आहे आणि त्या कंपनीने तिथे इमारत बांधली. तेव्हा मी आरोप केले होते की समीर भुजबळ यांनी ही जागा लाटली. समीर भुजबळ कालच्या पत्रकार परिषदेत खोटे बोलले. त्यांनी सांगितले की, आम्ही 2003 मध्ये त्यांना पैसे देत होतो. त्यांनी सांगितले की या कुटुंबाने तेव्हा उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की, दमानियाबाई सुपारीबाज आहे. पण माझा नवरा खूप कमावतो आणि टॅक्सपण भरतो. तुमच्या सारखा नाही. सुपारीबाज लोक तुम्ही आहात. तुमच्या विरोधात कधीच एफआयआर झाला पाहिजे होता. फर्नांडिस यांचा जो बंगला होता तो वडिलांचा होता आणि त्यांना तीन मूले होती. पुढे पॉवर एटॉर्नीमध्ये यांच्यावर सगळे होल्ड आले. तसेच यांच्या बहिणीने हेच केले. समीर भुजबळ काल सांगत होते की, आम्हाला सहनुभूती वाटत होती म्हणून आम्ही त्यांना पैसे देणार होतो. पण कधी पैसे दिले? तुम्ही यांना 5 फ्लॅट देणार होते. ते अजून का दिले नाहीत? असा सवालही दमानिया यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -