घरदेश-विदेशपी. चिदंबरम यांच्या कोठडीत २ सप्टेंबरपर्यंत वाढ

पी. चिदंबरम यांच्या कोठडीत २ सप्टेंबरपर्यंत वाढ

Subscribe

कोर्टाने पी. चिदंबरम यांच्या कोठडीत २ सप्टेंबर्यंत वाढ केली आहे.

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने दणका दिला आहे. कोर्टाने चिदंबरम यांची २ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी वाढवली आहे. सीबीआयने कोर्टाकडे चिदंबरम यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. यावेळी कोर्टाने सीबीआय एकदाच १५ दिवसांची कोठडी का मागत नाही? असा सवाल सीबीआयला केला. अखेर कोर्टाने २ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी वाढवली.

- Advertisement -

हेही वाचा – पी. चिदंबरम हिंदू दहशतवाद शब्दाचे ‘जनक’! 


‘चिदंबरम तपासामध्ये सहकार्य करत नाहीत’

चिदंबरम तपासामध्ये सहकार्य करत नाही, असे सीबीआयने कोर्टात सांगितले. त्यामुळे आता इतर आरोपी आणि चिदंबरम यांची समोरासमोर चौकशी करण्याची गरज असल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले. दरम्यान, चिदंबरम यांना आतापर्यंत ४४ प्रश्न विचारण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -