घरमुंबईअनुप डांगे प्रकरणी परमबीर सिंह यांना एसीबीकडून समन्स; 2 फेब्रुवारीला चौकशीला हजर...

अनुप डांगे प्रकरणी परमबीर सिंह यांना एसीबीकडून समन्स; 2 फेब्रुवारीला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना

Subscribe

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे म्हणत त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. तसेच त्यांचे पब मालकांशी आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोपही अनुप डांगे यांनी केले होते. यानंतर त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. याच प्रकरणी आता परमबीर सिंह यांना एसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे. यात त्यांना 2 फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यास हजर राहण्याची सूचना दिली आहे. परमबीर यांना तिसऱ्यांदा हा समन्स बजावण्यात आला आहे. सिंह यांनी यापूर्वी कोरोनाचे (Covid19) कारण देत दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला होता.  त्यानुसार एसीबीने आता खुली चौकशी सुरू केली आहे. तर सीआयडीकडून ही या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्यावर्षी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांनी एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी परमबीर सिंह यांचे पब मालकाशी संबंध असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली होती. तसेच परमबीर सिंह यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे म्हणत भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. त्यावेळी व्हॉट्सअॅप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात मेसेज पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळ विभागात बदली करण्यात आली.

- Advertisement -

23 नोव्हेंबर 2019 रोजी गावदेवी येथील डर्टी बन्स हा पब रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याने बंद करण्यासाठी गावदेवी पोलीस तेथे पोहचले. यावेळी पोलीस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी जीतू नवलानी याला आरोपी म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर या प्रकरणाचा ठपका डांगे यांच्यावर ठेवत त्यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असा आरोप डांगे यांनी केला. तसेच त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले होते.

या पत्रात डर्टी बन्स पबचे मालक जितू नवलानी याने परमबीर सिंह यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगून दबाव टाकण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये परमबीर सिंह मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. तसेच सिंह यांच्या अंडरवर्ल्डसोबत संबंधांबाबतही चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र दोन वर्षे याप्रकरणी कोणतीच कारवाई न झाल्याने डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता याप्रकरणाची चौकशी सीआयडीला करण्यास परवानगी दिली आहे. तसेच अँटी करप्शन ब्युरो देखील या प्रकरणातील भ्रष्टाचाराचा तपास करणार आहे.


Air India Handover: एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समूहाच्या हाती


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -