घरमुंबईCorona: APMC मार्केटमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असणार ड्रोनची नजर

Corona: APMC मार्केटमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असणार ड्रोनची नजर

Subscribe

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समिती परिसरात पोलिसांकडून ड्रोनचा वापर

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी त्याचे उल्लंघन करून त्याचा फज्जा उडवल्याचे बघायला मिळत आहे. भाजी मार्केट, दुकान, बँक याठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने कडक पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. दरम्यान भाजी मार्केटमध्ये होणारी मोठी गर्दी पाहता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने काही दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बुधवारी पुन्हा मुंबई उत्पन्न बाजार समिती सुरु करण्यात आली आहे. परंतु यावेळी बाजार समितीत होणाऱ्या गर्दीवरील नियंत्रण राखण्यासाठी आता ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

अशी असेल ड्रोनची नजर

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समिती परिसरात पोलिसांकडून ड्रोनचा वापर केला जाणार आहे. बाजार समितीमधील होणारी गर्दी आणि त्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन केले जात आहे की नाही, यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर असणार आहे. जर या नियमांचे कोणाकडून पालन करण्यात आले नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

- Advertisement -

नियमानुसार मार्केटमध्ये सुरू राहणार काम

कृषी उत्पन्न बाजार समितीत काही नियमही करण्यात आले आहे. त्या नियमानुसार काम सुरु राहणार आहे. यामध्ये कोणाला माल मागवायचा असेल तर त्यांना बाजार समितीच्या भाजीपाला विभागाच्या कार्यालायत येणाऱ्या मालाची माहिती आधीच लेटरपॅडवर गाडी क्रमांकसह द्यावी लागणार आहे. जे व्यापारी याची माहिती बाजार समितीला देतील त्यांनाच बाजार समितीत प्रवेश दिला जाणार आहे.

- Advertisement -

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपला – कांदा बटाटा मार्केट आजपासून सुरू झाले आहे. आज मार्केटमध्ये १८० गाड्या दाखल झाल्या आहेत. भाजी मंडईमध्ये गर्दी होत असल्याने शनिवारी हे मार्केट बंद करण्यात आले होते. चार दिवसानंतर हे मार्केट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यावर नजर ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी आजपासून ड्रोनचा वापर करणार आहेत. भाजीपला आणि धान्य मार्केटमध्ये गर्दी बघायला मिळते. यावर गर्दी होऊ नये यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.


Coronavirus : वांद्रे गर्दी मागे नेमका कुणाचा हात? संभाषणाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -