घरमुंबईमुंबईतील जेलमधील कैद्यांसाठी एआरटी सेंटर

मुंबईतील जेलमधील कैद्यांसाठी एआरटी सेंटर

Subscribe

नॅशनल स्टडीनुसार, १.७ टक्के कैदी हे एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. सामान्य जनतेच्या तुलनेत जेलमधील एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती हायरीस्कमध्ये मोडतात. याच पार्श्वभूमीवर आर्थर रोड, भायखळा जेल आणि पोलीस हॉस्पिटलमध्ये १ डिसेंबरपासून एआरटी (अँटिरेट्रोवायरल थेरपी) केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.

जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांसाठी आणि तिथल्या अधिकाऱ्यांसाठी एचआयव्ही हे प्रमुख आणि मुख्य आव्हान आहे. नॅशनल स्टडीनुसार, १.७ टक्के कैदी हे एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. सामान्य जनतेच्या तुलनेत जेलमधील एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती हायरीस्कमध्ये मोडतात. याच पार्श्वभूमीवर आर्थर रोड, भायखळा जेल आणि पोलीस हॉस्पिटलमध्ये १ डिसेंबरपासून एआरटी (अँटिरेट्रोवायरल थेरपी) केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे तुरुंगातच कैद्यांची एचआयव्ही तपासणी आणि त्यावरील औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त एमडॅक्स आणि राज्य गृह विभागासह ही एआरटी केंद्रे सुरू होणार आहेत. आतापर्यंत कैद्यांना उपचारांसाठी भायखळ्यातील सर जे.जे हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं.

आता तुरुंगामध्येच एआरटी केंद्र

अत्यंत संवेदनशील खटल्यांमधील आरोपी अथवा कैद्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे सक्त आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने तुरुंग महानिरीक्षकांना काही महिन्यांपूर्वीच दिले होते. त्यानुसार, कैद्यांना तुरुंगात दाखल केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्याला काही आजार असल्यास तुरुंग हजेरीपटात नोंद करण्याचे निर्देशही आयोगाने दिले होते. अनेक कैद्यांना एचआयव्हीची लागण असल्याचंही वारंवार समोर आलं आहे. पण, एआरटी कैंद्रात घेऊन जाण्यासाठी तुरुंगाबाहेर आल्यानंतर अनेक कैदी पळून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे आता तुरुंगातच त्यांच्यासाठी एआरटी केंद्र सुरू केलं गेलं आहे.

या कैद्यांना आधी सर.जे.जे हॉस्पिटलमधील एआरटी सेंटरमध्ये जावं लागत होतं. या तिन्ही ठिकाणांमधील जवळपास १५० कैद्यांना उपचार मिळणं शक्य होणार आहे. आम्ही जेल कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषध आणि उपचारांच्या वापराबद्दल प्रशिक्षण दिलं आहे. जेलमधील एआरटी केंद्र प्रवासाचा वेळ कमी करेलच शिवाय जे.जे हॉस्पिटलच्या एआरटी केंद्राचा भारही कमी होणार आहे. जेल कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देऊ. औषधांचा स्टॉक दर महिन्याला नव्याने पुरवला जाणार आहे.

– डॉ. श्रीकला आचार्य, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालिका

 

पद्घतशीरपणे कैंद्यांवर होणाऱ्या उपचारांचा ट्रॅक ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. या तिन्ही एआरटी सेंटर्सनंतर उपनगरातील मालवणीमध्ये ही सेंटर सुरू केलं जाणार आहे.

– डॉ. पद्मजा केसकर, मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी

- Advertisement -

हेही वाचा – ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदी फुलवतात शेती!

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -