घरमुंबईAtal Setu : आता अटल सेतूवरून धावणार 'बेस्ट बस'; असा असेल मार्ग

Atal Setu : आता अटल सेतूवरून धावणार ‘बेस्ट बस’; असा असेल मार्ग

Subscribe

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या वर्ल्ड ट्रेड सेंटर ते बेलापूर या दरम्यान 21 जानेवारीपासून सुरू झालेल्या अटल सेतूवरून प्रायोगिक तत्वावर धावणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या मुंबई ते बेलापूर बसप्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद प्रवास घडून मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र या बससेवेला चांगला प्रतिसाद लाभला तर या मार्गावर बेस्ट बसगाड्यांची संख्या व फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. (Atal Setu Now Best Bus will run from Atal Setu That would be the way)

हेही वाचा – Bharat Ratna : राम मंदिराच्या लढ्यातील दोन्ही शिलेदारांना भारतरत्न; वाचा सविस्तर…

- Advertisement -

मुंबई-नवी मुंबई परिसराला नाव्हा-शेवा मार्गाने म्हणजे अटल सेतूद्वारे जोडणारी वाहतूक सेवा 21 जानेवारीपासून सुरू झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना इंधनात, वेळेत बचत होवून सुखकर प्रवासाबाबत मोठा दिलासा मिळत आहे. मात्र आता या अटल सेतूवरून बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्याही प्रायोगिक तत्वावर धावणार आहेत. या मार्गावरील बेस्ट बससेवेला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत बेस्टकडून निरिक्षण करण्यात येणार आहे.

जर प्रवाशांनी बेस्ट बससेवेला चांगली पसंती दिल्यास व बेस्ट प्रशासनानेही संख्या वाढवण्यात येईल. बेलापूर ते कफ परेड वर्ल्ड ट्रेड सेंटर या दरम्यान बेस्टची बस धावणार आहे. मात्र बसमध्ये प्रवासी भाडे म्हणजे तिकीट दर काय असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. या अटल सेतूवर बेस्ट उपक्रमाकडून बस नंबर “एस-145” चालवण्यात येणार आहे. हा बस मार्ग 145 कोकण भवन, बेलापूर ते कफ परेड वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान धावणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Dahisar Firing : घोसाळकर गोळीबार प्रकरण; विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतू पुलाचे उद्घाटन 21 जानेवारी रोजी करण्यात आले होते. हा अटल सेतू 21.8 किलोमीटर लांब असून या सेतूवर बेस्टची पहिली बससेवा ही सार्वजनिक वाहतूक सेवा ठरणार आहे. अटल सेतू 21.8 किमी लांब असून 16.5 किमी मार्ग समुद्रावर आहे. तसेच अटल सेतू बनवण्यासाठी तब्बल 17,840 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -