घरमुंबईMallikarjun Kharge : आरएसएस व मनुवादी शक्तींकडून...; खर्गेंचा भाजपावर निशाणा 

Mallikarjun Kharge : आरएसएस व मनुवादी शक्तींकडून…; खर्गेंचा भाजपावर निशाणा 

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज मुबंईतील शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची पहिली सभा होत आहे. या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकार आणि भाजपावर टीकास्त्र सोडले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, आरएसएस व मनुवादी शक्तींकडून लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. (Attempts are being made to crush people by RSS and humanist forces Mallikarju Kharge targets BJP)

हेही वाचा – Sharad Pawar : आता देशात मोदी गॅरंटी दिसणार नाही; शरद पवारांनी सांगितलं कारण

- Advertisement -

शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत, तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. 2014 साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. त्यामुळे ते नेहरू आणि आंबेडकर यांचे योगदान नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची आणि मनुवादची शक्ती आहे. या शक्तीने ते लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप मल्लिकार्जून खर्गे यंनी केला.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मुंबई हे सर्वात शक्तीशाली शहर आहे. सर्व देशाचे लक्ष मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भूमी आहे, इथून विचार सर्व देशात पोहचतो, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींनी किती गॅरंटी दिल्या व त्या पूर्ण केल्या का? असा सवालच त्यांनी विचारला. तसेच आज लोकशाही व संविधान अबाधित ठेवणे आपली जबाबदारी आहे. संविधान बदलणे सोपे नाही पण तसा प्रयत्न केला तर देशात मोठी क्रांती होईल, असा इशारा मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Mehbooba Mufti : मोदींच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा घडलं, तरीही ते…; मेहबूबा मुफ्तींचा आरोप

नरेंद्र मोदींच्या आडून एक शक्ती हा देश चालवतेय

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदींची 56 इंचाची छाती नाही तर ते एक पोकळ व्यक्ती आहे. नरेंद्र मोदी फक्त मुखवटा आहे. त्यांच्या आडून एक शक्ती हा देश चालवत आहे. नरेंद्र मोदी फक्त देशातील लोकांचे लक्ष विचलित करत आहे. दिवे लावा, थाळी वाजवा सांगून ते देशाचे लक्ष्य मूळ प्रश्नावरून विचलित करत आले आहेत. ही शक्ती जाणीवपूर्वक देशात अराजकता आणि द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. या देशाची संस्कृती द्वेषाची नाही तर प्रेमाची आहे. या देशात जेवढे महान लोक होऊन गेले त्यांनी प्रेमाचाच संदेश दिला आहे. महात्मा गांधी, भगवान बुद्ध, प्रभू श्रीराम या सर्वांनी प्रेमाचाच संदेश दिला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -