घरक्रीडाWPL 2024: मुलांनी नाही, पण RCB च्या पोरींनी करून दाखवलं, दिल्लीला पराभूत...

WPL 2024: मुलांनी नाही, पण RCB च्या पोरींनी करून दाखवलं, दिल्लीला पराभूत करत जेतेपद जिंकलं!

Subscribe

महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपद जिंकले आहे. नुकताच महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात एलिस पेरीच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपद जिंकले आहे. नुकताच महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात एलिस पेरीच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. दिल्ला ८ विकेट्सने पराभव करत बंगळुरूने पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगचे जेतेपद जिंकले. बंगळुरूच्या महिलांच्या संघाने महिला प्रीमियर लीग जिंकल्याने सोशल मीडियासह क्रिकेटप्रेमींमध्ये ‘मुलांनी नाही, पण RCB च्या पोरींनी करून दाखवलं’, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Wpl 2024 Final Royal Challengers Banglore Won By 8 Wickets Beat Delhi Capitals)

इंडियन प्रीमियर लीगचे यंदाचे 17वे पर्व असून मागील 16 पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला एकदाही जेतेपद जिंकता आले नाही. त्यामुळे सातत्याने बंगळुरूचे चाहते नाराज होते. मात्र आज महिलांच्या विजयामुळे आयपीएल नाही पण महिला प्रीमियर लीगच्या जेतेपदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव कोरले गेले आहे. त्यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्लीने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाला चांगली खेळी करता आली नाही. बंगळुरूच्या गोलंदाजांच्या बेधक माऱ्यामुळे दिल्लीच्या संघाला केवळ 114 धावांचे लक्ष्य बंगळुरूसमोर ठेवता आले. मॉलिन्यू, श्रेयंका आणि आशा शोभनाच्या भेजक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबी संघाने पहिल्याच डावात सामना आपल्या बाजून वळवून घेतला.

त्यानंतर फंलदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाने डिव्हाईन आणि मानधनाने संघाला चांगली सुरूवात करून दिली. लक्ष्य साधारण असल्याने दोघीही शांत फलंदाजी करत होत्या पण डिव्हाईन मात्र तिच्या नावाप्रमाणेच एकापेक्षा एक डिव्हाईन शॉट्स मारत होती. शिखा पांडेने डिव्हाईनला बाद करण्यापूर्वी तिने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. तर पेरी आणि मानधना संघाचा डाव पुढे नेत असतानाच स्मृती मिन्नू मिनीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने ३१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या.

- Advertisement -

दरम्यान, एलिस पेरीच्या जबरदस्त चौकार आणि अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये अष्टपैलू खेळी करत आरसीबीच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ विकेट्सने पराभव केला. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमधील एकूण १७ वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे.


हेही वाचा – IPL 2024 : निवडणुकीच्या हंगामात क्रिकेटचे मैदानही गाजणार; आयपीएलचे 17वे पर्व भारतातच होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -