घरमुंबईराणीबागेत माहितीपटांतून घडणार प्राण्यांचे दर्शन

राणीबागेत माहितीपटांतून घडणार प्राण्यांचे दर्शन

Subscribe

मुंबई महापालिका आणि अ‍ॅनिमल प्लॅनेट चॅनेलच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईतील पहिलाच 'वन्यप्राणी व पर्यावरण टूडी थिएटर प्रकल्प' भायखळा येथील राणीबागेम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येत आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीबाग)येणार्‍या पर्यटकांना प्राण्यांचे दर्शन घडत नसल्याने, त्यांचा हिरमोड होतो. परंतु, आता प्राणी नसल्याने पर्यटकांना निराश होवून राणीबागेतून माघारी फिरायची गरज नाही. कारण राणीबागेत येणार्‍या पर्यटकांना अ‍ॅनिलम प्लॅनेट चॅनेलच्या माध्यमातून वन्यप्राणी आणि पर्यावरण विषयक माहितीपट दाखवला जाईल. त्यामुळे राणीबागेतील पिंजर्‍यात प्राणी येतील तेव्हा येतील पण तोपर्यंत अ‍ॅनिमल प्लॅनेट चॅनेलच्या माध्यमातून प्राण्यांचे दर्शन मात्र, पर्यटकांच्या आनंदात भर पाडणार आहे. मुंबई महापालिका आणि अ‍ॅनिमल प्लॅनेट चॅनेलच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईतील पहिलाच ‘वन्यप्राणी व पर्यावरण टूडी थिएटर प्रकल्प’ भायखळा येथील राणीबागेम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येत आहे. याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संयुक्तपणे केली. याप्रसंगी डिस्कवरील डिजिटरी नेटवर्क चॅनेलच्या उपाध्यक्षा झुल्फीया वारिस उपस्थित होत्या.

धक्कादायक : नोकरीचं आमिष दाखवून गृहिणीची ऑनलाईन फसवणूक

या थिएटरमध्ये प्रत्येक दिवशी ४ खेळ दाखवले जाणार आहेत. यासाठी पाच माहितीपट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका शाळेतील विदयार्थ्यांसाठी हे खेळ निशुल्क राहणार आहेत. मात्र इतरांसाठी शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क किती आकारले जावे हे निश्चित केलेले नाही. या खेळांचा आढावा घेवून त्याप्रमाणे पर्यटकांसाठी शुल्क निश्चित करून आकारले जाईल,असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले. सुमारे २०० आसनांचे सिनेमागृह असून त्यामध्ये सायंकाळी ११ ते ५ या वेळेत हे माहितीपट दाखवले जाणार आहेत. प्रत्येक माहितीपट हा ४० मिनिटांचा असणार आहे. राणीबागेतील प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारीकरण करताना, त्यामध्ये काय काय असावे याचा विचार केला जात आहे. त्याचाच विचार करत अ‍ॅनिमल प्लॅनेटच्या माध्यमातून हे माहितीपट दाखवून वन्यप्राण्यांची माहिती पर्यटकांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा : IIT मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

भारतातील पहिली पेग्विंन गॅलरी राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात सुरु केल्यानंतर त्याठिकाणी पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मुंबईसह देशभरातील पर्यटक पेंग्विनच्या गॅलरीला भेट देत आहेत. मात्र,अ‍ॅनिमल प्लॅनेटमुळे उद्यान व प्राणिसंग्रहालयास भेट देणार्‍या हजारो पर्यटकांना जागतिक दर्जाच्या वन्यप्राणी व पर्यावरण या विषयावरील चित्रफित मुंबईतील बालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक अनोखी पर्वणी ठरणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -