घरक्राइमनवजात शिशूंची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बाळांचा 5 लाखांमध्ये करत होते व्यवहार

नवजात शिशूंची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बाळांचा 5 लाखांमध्ये करत होते व्यवहार

Subscribe

मुंबईत कधी काय घडेल सांगता येत नाही. रोज नवनवीन गुन्हे समोर येत असून, काही जण पैशांच्या लालसेपोटी अशी काही कृत्ये करीत आहेत की, त्या घटनामधून क्रृरता समोर येत आहे.

मुंबई : ट्रॉम्बे पोलिसांनी नवजात शिंशूची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. येथील पूर्व उपनगरात नवजात शिशू पाच लाख रुपयांना विकणाऱ्या सहा महिलांना पोलिसांनी अटक केली. काही महिलांकडून एक बनावट नर्सिंग होम चालवला जात आहे आणि त्या जागेवर एक मूल एका महिलेला 5 लाख रुपयांना कोणतीही कागदपत्रे न देता विकल्या जात आहे अशा माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केला आहे.(Baby selling gang busted 5 lakhs of babies were being traded)

मुंबईत कधी काय घडेल सांगता येत नाही. रोज नवनवीन गुन्हे समोर येत असून, काही जण पैशांच्या लालसेपोटी अशी काही कृत्ये करीत आहेत की, त्या घटनामधून क्रृरता समोर येत आहे. असाचा काहीसा प्रकार पोलिसांच्या कारवाईतून समोर आला आहे. मुंबईतील शिवाजीनगर गोवंडी भागात चालत असलेल्या अनधिकृत रहमानी नर्सिंग होमच्या माध्यमातून सुरू असलेल्या बालक विक्री रॅकेटचा पर्दाफाश ट्रॉम्बे पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी दोन नवजात शिशूंची सुटका केली आहे.

- Advertisement -

मास्टरमाईंड ज्युलीयावर सातवा गुन्हा

विशेष म्हणजे या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेली ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. बाळ विक्री प्रकरणात आता तिच्याविरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. तुरुंगातून नुकतीच जामिनावर सुटली होती. ज्युलीया फर्नांडिस नवजात बाळांच्या विक्रीचे रॅकेट चालवत असे.

हेही वाचा : राज्यातील 2300 ग्रामंपचायतीच्या निवडणुकांचा धुरळा; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

- Advertisement -

असे चालत होते रॅकेट

आरोपी जुलीया फर्नांडिस हिला यापूर्वी अशा सहा गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ती आयव्हीएफ केंद्रांसाठी डोनेटरची व्यवस्था करते. IVF हे प्रजननक्षमतेची समस्या असलेल्या लोकांना बाळ होण्यास मदत करण्यासाठी उपलब्ध अनेक तंत्रांपैकी एक आहे. या केंद्रांद्वारे आरोपी जुलीया फर्नांडिस ही मुलाची गरज असलेल्या लोकांशी संपर्क साधत होती. त्यानंतर ती आपल्या एजंटांच्या मदतीने ती नवजात बाळाला विकू इच्छिणाऱ्या पालकांसोबत बोलणी करत असे आणि बाळांची विक्री करायची. अशा प्रकरणाचे तिच्यावर सहा गुन्हे दाखल होते. आजच्या या घटनेनंतर तिच्यावर हा सातवा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : ठाकरे गट भाजपच्या इशाऱ्यावर चालतो; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

फर्नांडिसच्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया

फर्नांडिस ही एक अहम नावाची स्वयंसेवी संस्थादेखील चालवते. आता, या स्वयंसेवी संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी पोलिसांकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मास्टरमाईंड फर्नांडिस हीला जुलै 2022 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अशाच प्रकरणांमध्ये अटक केली होती. वरळी येथील रहिवासी असणाऱ्या ज्युलीया फर्नांडिस हिच्यावर एकूण सात गुन्हे असून तिच्यावर वडाळा टीटी, ठाणे आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -