घरमुंबई'बेस्ट'च! मुंबईत सुरू होणार ई-बाईक सेवा; प्रति किमी 3 रुपये भाडे

‘बेस्ट’च! मुंबईत सुरू होणार ई-बाईक सेवा; प्रति किमी 3 रुपये भाडे

Subscribe

मुंबईकरांसाठी बेस्टने एक आनंदाची बातमी दिली आहे. संपूर्ण मुंबईत लवकरच ई-बाईक सेवा सुरू होणार आहे. बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमधून उतरल्यानंतर या ई-बाईकने आपल्या गंतव्यस्थानी जाता येणार असल्याची माहिती बेस्टने दिली आहे.

मुंबईकरांसाठी बेस्टने एक आनंदाची बातमी दिली आहे. संपूर्ण मुंबईत लवकरच ई-बाईक सेवा सुरू होणार आहे. बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमधून उतरल्यानंतर या ई-बाईकने आपल्या गंतव्यस्थानी जाता येणार असल्याची माहिती बेस्टने दिली आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. (Best E Bike Service in mumbai)

बेस्टने याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. बेस्टच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये 180 बस थांब्यांवर व्यावसायिक तसेच निवासी भागात 1000 ई-बाईक तैनात केल्या जाणार आहेत. सुरुवातीला या ई-बाईक्स मुंबईमध्ये अंधेरी, विलेपार्ले, जुहू, सांताक्रूझ, खार, वांद्रे माहीम आणि दादर येथे उपलब्ध केल्या जाणार आहेत.

- Advertisement -

याशिवाय, शहराच्या उर्वरित भागांत त्यांचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जून 2023 पर्यंत 5000 ई-बाईक सेवेत आणण्याचे बेस्टचे लक्ष असल्याचे समजते. लवकरच ही सेवा बेस्ट चलो अॅपसोबत संलग्न केली जाणार आहे.

ई-बाईकचा प्रवाशांना काय होणार फायदा?

- Advertisement -
  • व्यावसायिक आणि निवासी भागात प्रमुख बस थांब्यांवर व्यवस्था
  • मूळ भाडे फक्त 20 रुपये, प्रति किमी प्रवासासाठी 3 रुपये आणि 1.50 रुपये प्रति मिनिट.
  • सुरक्षित वेग. शहरातील प्रवासांसाठी अत्यंत सुरक्षित असा 15 किमी प्रति तास पर्यंत मर्यादित आहे.
  • वायू किंवा ध्वनी प्रदूषण होणार नाही. ई-बाईक कोणत्याही प्रकारचे वायू किंवा ध्वनी प्रदूषण करत नाहीत.
  • गर्दी कमी असलेल्या रस्त्यावरील प्रत्येकासाठी जलद प्रवास.
  • ई-बाईक चालवण्यासाठी परवान्याची आवश्यक नाही.

ई-बाईकची वैशिष्ट्ये

  • बेस्टकडून सेवेत आणल्या जाणाऱ्या या ई-बाईक वोगो कंपनीच्या आहेत.
  • या बाईकची गती कमी असल्याने याला चालवण्यासाठी चालक परवान्याची आवश्यक नाही.
  • या बाईकचा लाभ सर्वसामान्यांना घेता येणार आहे.
  • ही बाईक गिअरलेस आहे.
  • बाईक अनलॉक करण्यासाठी आणि चालवण्यासाठी Voga या वापर आणि नंतर फेरी संपल्यानंतर त्यांना पुन्हा लॉक करता येईल.
  • चलो अॅपच्या माध्यमातून तुम्ही ही बाईक भाड्याने घेऊ शकता.
  • यासाठी तुम्ही ओनलाईन युपीआयच्या माध्यमातून भाडयाची रक्कम देऊ शकता.

हेही वाचा – घटस्फोटीत पतीला पत्नीने चहा-नाश्ता द्यायची गरज नाही, कोर्टाचा निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -