घरपालघरआत्महत्या नसून घातपात ?

आत्महत्या नसून घातपात ?

Subscribe

तिने कौटुंबिक कलहातून गळफास घेतला असल्याचा संशय व्यक्त केला असला तरी ही आत्महत्या नसून घातपात केला असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

वाडा: वाडा शहरातील मंगल पार्क येथे राहणार्‍या महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना सोमवारी (२६ सप्टेंबर) सकाळच्या सुमारास घडली असून सदर महिलेस आत्महत्या करण्या प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. तिने कौटुंबिक कलहातून गळफास घेतला असल्याचा संशय व्यक्त केला असला तरी ही आत्महत्या नसून घातपात केला असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.सोमवारी यास्मिन इरफान(गुड्डू) अन्सारी (वय२२) या महिलेने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले असून या महिलेस तिचा पती, दिर व ननंदेचा नवरा यांनी दुचाकीसाठी तगादा लावला होता. या अगोदरही तिच्या पतीला एक लाख रुपये दिले असल्याचा उल्लेखही तक्रारीत केला आहे. सदर महिलेस नऊ महिन्यांची मुलगी व साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इरफान अन्सारी, सलाउद्दीन अन्सारी, करमुल्ला अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून मृतक महिलेचा पती इरफान अन्सारी याला अटक केली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी जव्हार प्रशांत परदेशी व पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोडदे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -