घरमुंबई‘बेस्ट’चे जुने स्मार्टकार्ड होणार रद्द; प्रवाशांना १० मेपर्यन्त मिळणार परतावा

‘बेस्ट’चे जुने स्मार्टकार्ड होणार रद्द; प्रवाशांना १० मेपर्यन्त मिळणार परतावा

Subscribe

बेस्टच्या ‘चलो अॅप’च्या नवीन सुविधेमुळे बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसह अन्य सर्व प्रवाशांना दिलेली ‘आरएफआयडी स्मार्टकार्ड’ (जुने) रद्द करण्यात येणार आहेत. नवीन प्रणाली अंतर्भूत करण्यापूर्वी २१ जानेवारीपूर्वी ज्या प्रवाशांनी स्मार्टकार्ड घेतली त्या स्मार्टकार्डची वैधता १० मे २०२२ पासून रद्द केली जाणार आहे. त्यापूर्वी संबंधित प्रवाशांनी बेस्टकडे लेखी अर्ज करून आपला परतावा मिळवावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बेस्ट उपक्रमाने गेल्या डिसेंबरपासून ‘चलो’ मोबाइल अॅप’ ची नवीन सेवा सुरू केली आहे. त्यामुळे यापूर्वी दिलेल्या मात्र सेवेत असेलेल्या स्मार्ट कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे, बेस्टच्या ज्या प्रवाशांकडे हे जुने स्मार्टकार्ड आहे त्या स्मार्टकार्डची वैधता १० मे २०२२ पासून रद्द केली जाणार आहेत.त्यापूर्वी संबंधित कार्डमधील शिल्लक रकमेचा परतावा बेस्टकडून घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

बेस्टच्या प्रवाशांनी जुन्या कार्डमधील रकमेच्या परताव्यासाठी बेस्ट उपक्रमाला लेखी स्वरुपात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज मूळ ट्रायमॅक्स आरएफआयडी कार्डसह उपक्रमाच्या जवळच्या बसआगार किंवा वडाळा आगार येथील नियोजन विभागात सादर केला जावा. यासाठी अर्जदाराने अर्जामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक असावा, असे बेस्टने म्हटले आहे.

तसेच, जुन्या कार्डाची वैधता रद्द होणार असल्याने प्रवाशांनी यापुढील प्रवासासाठी नवीन चलो कार्ड घेऊन प्रवास करावा, असे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -