घरताज्या घडामोडीKabul Mosque Blast: काबूलमध्ये नमाजानंतर भीषण स्फोट, १० जणांचा मृत्यू तर २०...

Kabul Mosque Blast: काबूलमध्ये नमाजानंतर भीषण स्फोट, १० जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

Subscribe

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झाला आहे. राजधानी काबुलमधील एका मशिदीत आज झालेल्या भीषण स्फोटात जवळपास १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. ही माहिती तालिबानच्या प्रवक्त्याने दिली आहे. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी शेकडो लोक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. त्याचवेळी हा स्फोट झाल्याचं सांगितलं जातयं. मात्र, यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेनंतर तालिबानी सुरक्षा कर्मचार्‍यांनी परिसराला वेढा घातला असून, अद्याप कोणीही या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोट इतका भीषण होता की, मशिदीच्या आजूबाजूच्या इमारती हादरल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर दोन तासांनी हा स्फोट झाला, जेव्हा तेथे मोठ्या संख्येने लोक जमले होते, असं गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद नफी तकोर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

याआधी गुरुवारी काबूलमध्ये काही मिनिटांतच सलग दोन स्फोट झाले होते. या स्फोटात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अनेक जखमी लोकांना रुग्णालयात दाखल केले असता, आणखी एका जखमीचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांची संख्या १० वर पोहोचली.

- Advertisement -

हेही वाचा :  Boris Becker Jail: टेनिस स्टारपटू बोरिस बेकरला अडीच वर्षांचा तुरुंगवास, करोडोंची रक्कम लपवून स्वतःला घोषित केलं दिवाळखोर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -