घरमुंबईलॉकडाऊनमध्ये भाजप नगरसेवकाची पार्टी

लॉकडाऊनमध्ये भाजप नगरसेवकाची पार्टी

Subscribe

पनवेलच्या अजय बहिरासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

लॉक डाऊनच्या काळात मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करणे पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिराला चांगलेच भोवले आहे. पनवेल पोलिसांनी बहिरा आणि त्यांच्या दहा मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. मानवी अस्तित्वासाठी अखंड देश लढतोय. त्यासाठी सोशल डिस्टन्सींग राखण्याचे आवाहन शासन, प्रशासनाने दिले असताना पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकाने भलताच प्रताप केला आहे. मित्रांना घरी बोलावून वाढदिवसाची पार्टी देण्याचा बेत आखला. मात्र, पार्टी देणे बहिरा यांच्या अंगलट आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या पनवेल पालिकेच्या नगरसेवक व इतर दहा जणांवर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० – क मधून निवडून आलेले अजय तुकाराम बहिरा यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका जागरुक नागरिकाने याबाबत माहिती दिल्यावर शुक्रवारी रात्री १२ वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांच्यासह पथक नगरसेवक बहिरा यांच्या घरी दाखल झाले असता, त्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले दहा मित्र व नगरसेवक बहिरा आढळून आले. तेथील दारूची बाटलीही पोलिसांनी जप्त केली.

- Advertisement -

याप्रकरणी तातडीने नगरसेवक बहिरा व अन्य दहा जणांविरोधात संसर्ग साथ नियंत्रणात निष्काळजी वर्तन केले म्हणून आणि संचारबंदीत चारपेक्षा अधिक जण जमवले म्हणून गुन्हे नोंदविले आहेत. नगरसेवकाने केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -