घरCORONA UPDATEराजकीय वातावरण तापले; भाजपा नेत्याने गृहमंत्र्यांकडे मागितला खुलासा

राजकीय वातावरण तापले; भाजपा नेत्याने गृहमंत्र्यांकडे मागितला खुलासा

Subscribe

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीतील तबलीग जमातच्या कार्यक्रमावरून काही प्रश्न उपस्थित केले होते. आता त्याच मुद्द्यावर राजकारण होताना दिसत आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मरकजचा मुद्दा घेऊन अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला होता. निजामुद्दीन तबलीग जमातच्या कार्यक्रमासंबंधी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. तर त्याची उत्तर त्यांनी अजित डोवाल यांच्याकडे मागितली होती. याकरता अनिल देशमुख यांनी एक पत्र जाही केले होते. मात्र या पत्राबाबत साशंकता असल्याने गृहमंत्र्यांनी स्वतःच त्याबाबत खुलासा करावा, असे भाजपाचे नेते माधव भंडारी यांनी म्हटले आहे. यासंबंधीचे पत्रक माधव भंडारी यांनी जारी केले आहे.

ते पत्र देशमुखांचे नाही?

भाजपा नेते माधव भंडारी यांनी म्हटले आहे की, कालपासून समाज माध्यमांवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवरील एक पत्र फिरत आहे. या पत्राच्या सत्यतेबद्दल साशंकता असून त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वृत्तपत्रे तसेच प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या काही मंडळींचा असा दावा आहे की, हे पत्र गृहमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत आले आहे. तर काही प्रसार माध्यमे हे पत्र खोटे अथवा बनावट असल्याचे म्हणत आहेत. मात्र हे पत्र खोटे असल्याचे भासते. त्यातील भाषा बघता ती सरकारी किंवा औपचारिक नसून अतिशय अनौपचारिक आहे. त्यामुळे त्या पत्राबाबतचा संभ्रम अधिकच वाढत आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर खुलासा करावा आणि जर हे पत्र खोटे असले तर त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माधव भंडारी यांनी केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्राबाबतच साशंकता निर्माण झाली असून आता माधव भंडारी यांच्या निवेदनाला देशमुख काय उत्तर देणार हे पहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -