घरCORONA UPDATELockdown : पत्नी माहेरी अडकल्यामुळे पतीने केली आत्महत्या!

Lockdown : पत्नी माहेरी अडकल्यामुळे पतीने केली आत्महत्या!

Subscribe

उत्तर प्रदेशात एका माणसाने पत्नी विरहामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लॉकडाउनमध्ये दारु मिळत नसल्याने दारूची दुकाने सुरू ठेवा, अशी मागणी काही तलीरामांनी केली होती. पण दारू मिळत नसल्यामुळे काही जणांनी आत्महत्या करुन जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात एका माणसाने पत्नी विरहामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. मृत व्यक्तीची पत्नी लॉकडाउनमुळे तिच्या माहेरी घरी अडकली होती. तिला सासरी येणे शक्य नव्हते. पत्नीपासून हा दुरावा सहन होत नसल्याने त्याने आत्महत्या केली. राकेश सोनी (३२) असे मृताचे आहे.

बुधवारी गोंडामधील राधा कुंड भागात ही घटना घडली. राकेश सोनीची पत्नी आई-वडिलांच्या घरी गेली होती. लॉकडाउनमुळे ती तिथेच अडकली होती. राकेशला पत्नीची खूप आठवण येत होती. तो तिला मिस करत होता. हा विरह सहन होत नसल्याने त्याने आत्महत्या केली असे पोलीस निरीक्षक आलोक राव यांनी सांगितले. या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे.

- Advertisement -

बहुतेक नागरिक कुटुंबापासून दुरावले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ तारखेला लॉकडाऊनची घोषणा केली. आणि सर्व वाहतूक बंद झाली. त्यामुळे कामानिमित्त किंवा सणासुदीला गावी गेलेले नागरिक अडकून राहिले. हे लोक लॉकडाऊन संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, काही लोकांना आपल्या कुटुंबापासून लांब राहणे अवघड झाले आहे. अशावेळी, काही जण टोकाची भूमिका घेऊन आयुष्य संपवत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -