घरमुंबईक्रीडा संकुलाला टिपू सुलतानच्या नावानं राजकीय वादाला फोडणी; विश्व हिंदू परिषदेचा विरोध

क्रीडा संकुलाला टिपू सुलतानच्या नावानं राजकीय वादाला फोडणी; विश्व हिंदू परिषदेचा विरोध

Subscribe

या नामकरणाला स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

18 व्या शतकातील वादग्रस्त म्हैसूर शासक टिपू सुलतानचे नाव मुंबईतील क्रीडा संकुलाला दिल्याने राजकीय वाद उफाळून आला आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून मुंबई महापालिका क्षेत्रातील मालाड मालवणी परिसरातील क्रीडा संकुलाचे वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असे नामकरण  करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाचे काम स्थानिक आमदार, काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून पूर्ण झालेय. याचा लोकार्पण सोहळा देखील बुधवारी 26 जानेवारी रोजी अस्लम शेख यांच्याच हस्ते होणार आहे. याचे फलकही सर्व मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र या क्रीडा संकुलाच्या नामकरणाला आता विश्व हिंदू परिषद (VHP) आणि भाजपने विरोध दर्शवला आहे. एखाद्या प्रकल्पाचे नाव क्रूर हिंदूविरोधी देणे ही निंदनीय बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘हा आपल्या मुंबईची शांतता बिघडवण्याच्या उद्देश असून तो टाळता आला असता. आपला महाराष्ट्र ही संतभूमी असून येथील एका प्रकल्पाला क्रूर, हिंदूविरोधी नाव देणं निंदनीय आहे,’ असं मत विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी ट्विटवर व्यक्त केलयं. तर महाराष्ट्र भाजपाने या क्रीडा संकुलाचा एक फोटो ट्विट करत, हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या टिपू सुलतानच्या नावावरून उद्यानाला नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र भाजपने ट्वीट करत म्हटले की, “आपण भाजप सोडलं, हिंदुत्व नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, मग, हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या ‘टिपू सुलतान’च्या नावावर तुम्ही मुंबईतील एका उद्यानाचं नाव कसं ठेवलं? शिवसेनेला टिपू सुलतान आवडू लागला आहे का?” असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

मालवणी परिसरात टिपू सुलतान यांचे नाव देत सुरु होणाऱ्या क्रिडा संकुलाच्या लोकार्पण कार्यक्रमावर आता टीकेची झोड उठवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाच्या या प्रयत्नावर आता स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.


ऐतिहासिक! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी प्रवासी हवाई मार्गाने येणार भारतात


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -