घरमुंबई'अशा' लोकांसाठी बजेट ही चपराक - यशवंत जाधव

‘अशा’ लोकांसाठी बजेट ही चपराक – यशवंत जाधव

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने सादर केलेला बजेट मुंबईतील नागरिकांना दिलासा देणारा

देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सदर करण्यात आला. हा अर्थसंकल्प फसवा असल्याचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेने नगरिकांना स्वप्न दाखवणारे बजेट सादर केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत पैसे नाहीत. तर मुंबई महानगरपालिका विकासकामांसाठी निधी कुठून आणार त्यामुळे हा बजेट केवळ स्वप्न दाखवणारा आहे. असे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. यावर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापालिका तोट्यात आहे आसे म्हणणार्यांना हा बजेट चपराक आहे. मुंबई महानगरपालिकेने सादर केलेला बजेट मुंबईतील नागरिकांना दिलासा देणारा बजेट असल्याचे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बजेटच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. महानगरपालिकेचा बजेट हा नागरिकांना दिलासा देणारा बजेट आहे. तसेच या बजेटमध्ये जनतेवर कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. विकासकामांवर भर दिला आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेने लोकांना स्वप्न दाखवणारे बजेट सादर नाही केले. शिवसेना कधीही स्वप्न दाखवत नाही. मुंबईतील जनतेला सुविधा देणे हे मुंबई महानगरपालिकेचे काम आहे. भाजप नेहमीच लोकांना स्वप्न दखवत आली आहे. जनतेची फसवणूक करण्यात भाजप पटाईत असल्याचे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सगळे विकासकामे सुरु आहेत. भाजपने केलेल्या या आरोपावरही यशवंत जाधव यांनी प्रितिक्रिया दिली आहे. विकासकामे ही संपूर्ण मुंबईत सुरु आहेत. परंतु आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून हे भाजपला चांगले जमते. भाजपला त्यांच्या मतदारसंघात काम करता येत नसेल तर हा त्यांचा कमीपणा आहे. लोकांना कशा आणि कोणात्या प्रकारे सुविधा देऊ शकतो यावर आपण विचार केला पाहिजे. भाजपला हे जमत नसावं असे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेत निनावी पत्रामुळे खळबळ माजली आहे. या निनावी पत्राबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निनावी पत्राबाबत मला काही माहिती नाही. मी आज सकाळपासून माध्यमांमध्ये त्या निनावी पत्राबाबत ऐकले. अद्याप ते पत्र मला काही आलेले नाही. परंतु प्रशासन या निनावी पत्राची दखल नक्की घेतल. या पत्राबाबत योग्य काय आणि अयोग्य काय हे तपासून प्रशासन निर्णय घेईल असे त्यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -