घरताज्या घडामोडीमुंबईत १.७५ लाख किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; ५ कोटींची दंडवसुली

मुंबईत १.७५ लाख किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; ५ कोटींची दंडवसुली

Subscribe

राज्य शासनाने पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र तरीही सदर प्रतिबंधित प्लॅस्टिकची निर्मिती, विक्री आणि वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने मुंबई महापालिकेने जून २०१८ ते जानेवारी २०२२ या कालावधीत विविध ठिकाणी धाडी घालून तब्बल १ लाख ७५ हजार ४२८ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तसेच, ५ कोटी ३६ लाख ८५ हजार रुपये इतकी रक्कम दंड वसुली केली आहे.

महाराष्‍ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८च्या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकवर (उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्रतिबंधित प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅण्‍डल असलेल्या व नसलेल्या), प्‍लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या व एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप, ताटल्या (प्लेट), पेले (ग्लास), चमचे इत्‍यादीसह हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्रतिबंधित प्‍लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच आणि सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्‍यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्रतिबंधित प्‍लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे.

- Advertisement -

सदर अधिनियमानुसार, प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसर्‍या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांची कैद, अशी शिक्षेची तरतूद आहे. शासनाने पर्यावरणाला घातक प्लास्टिकच्या निर्मिती, विक्री, वापर यांवर बंदी घालूनही त्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिकेच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाडी घालून वरीलप्रमाणे आवश्यक ती कारवाई केली. तसेच, सदर प्रत‍िबंधित प्‍लास्टिकचा वापर करू नये, यासाठी मुंबई महापालिकेद्वारे व्यापारी, फेरीवाले, नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येते. जर प्रत‍िबंधित प्‍लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते.


हेही वाचा – रस्त्यांच्या कडेला असलेली बेवारस 782 वाहने जप्त, मुंबई पालिकेची धडक कारवाई

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -