घरमनोरंजनकंगनावर दंडात्मक कारवाई करा; BMC ची हायकोर्टाकडे मागणी

कंगनावर दंडात्मक कारवाई करा; BMC ची हायकोर्टाकडे मागणी

Subscribe

पालिकेतर्फे एच पश्चिम वॉर्डाचे अधिकारी भाग्यवंत लोटे यांच्यावतीनं कंगनाच्या याचिकेला उत्तर देत पालिकेनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. पालिकेने सकाळी ११ वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. याच कारवाईवर आता कंगनाने नुकसानभरपाई म्हणून पालिकेकडे २ कोटींची मागणी केली आहे.

दरम्यान, कंगनाने नुकसानभरपाई म्हणून पालिकेकडे केलेली २ कोटींची मागणी ही निराधार असून उलट खोटी याचिका दाखल केल्याबद्दल कंगनावरच दंडात्मक कारवाईची मागणी मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टात केली आहे. पालिकेतर्फे एच पश्चिम वॉर्डाचे अधिकारी भाग्यवंत लोटे यांच्यावतीने कंगनाच्या याचिकेला उत्तर देत पालिकेने आपले प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेतर्फे एच पश्चिम वॉर्डाचे अधिकारी भाग्यवंत लोटे यांच्यावतीने कंगनाच्या याचिकेला उत्तर देत पालिकेने आपले प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले आहे. या प्रकरणी हायकोर्टात येत्या २२ सप्टेंबरला न्यायमूर्ती काथावाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलेला दिलासा २२ सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे.


आता शिवसेनाच मुंबईच्या क्वीन नेकलेसची तोडमोड करतेय – आशिष शेलार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -