घरमहाराष्ट्रज्येष्ठ साम्यवादी नेत्या कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन

ज्येष्ठ साम्यवादी नेत्या कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ साम्यवादी नेत्या, माजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे आज दुपारी १२.३० च्या सुमारास दादर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहीत कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. साम्यवादी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या त्या कन्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरात सोडीयमचे प्रमाण कमी झाल्यामुळे फुफ्पुसात संसर्ग झाला होता. त्यांना दादर येथील शुश्रूषा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सीपीआयचे संस्थापक श्रीपाद डांगे यांचे कार्य पुढे नेताना त्यांनी डाव्या चळवळीला आपलं मोठं योगदान दिलं. शिवाय वडिलांच्या निधनानंतर देशभर पसरलेल्या ट्रेड युनियनचे काम जिवंत ठेवण्यात त्यांनी सतत प्रयत्न केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सीपीआयची मुळे रोवली गेली असताना त्याचा मोठा पसारा मात्र येथे झाला नाही. पश्चिम बंगाल, केरळ आणि ईशान्य राज्यांमध्ये या पक्षाचा वृक्ष झाला आणि हाती सत्ता आली. १९६० ते १९८० च्या दशकात लाल बावट्याची ताकद इतकी ताकदवान होती की त्यांचे संप आणि आंदोलनाने प्रस्थापितांच्या मनात धडकी भरे आणि कामगार, शोश्रित आणि आदिवासींच्या मागण्या मान्य होत असत. पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागात या पक्षाचे अस्तित्व अजून टिकून आहे.

- Advertisement -

रोझा देशपांडे यांनी आपल्या वडिलांकडून पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जीवाचे रान केलं. पण, नंतर वयोमानाने त्यांना हीच तडफ पुढे दाखवता आली नाही. पश्चिम बंगाल आणि केरळ मध्ये कायकर्त्यांच्या पुढच्या फळ्या तयार होत असताना महाराष्ट्रात तसं होऊ शकलं नाही, याची खंत देशपांडे यांना होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -