घरमुंबईBMC : मुंबई पालिकेचे साडेसात हजार अधिकारी, कर्मचारी लोकसभा निवडणूक कामासाठी जुंपले!

BMC : मुंबई पालिकेचे साडेसात हजार अधिकारी, कर्मचारी लोकसभा निवडणूक कामासाठी जुंपले!

Subscribe

लोकसभा निवडणूक कामकाजासाठी खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अखत्यारितील सोबत 'क' संवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाकरिता त्वरित जिल्हाधिकारी, मुंबई शहर आणि उपनगरे कार्यालयात पाठवावे. यापूर्वी निवडणूक कामाकरिता पाठवलेले कर्मचारी वगळून सोबत जोडलेल्या यादीतील कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यादीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येएवढे कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश महापालिका प्रमुख कामगार अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते.

मुंबई : राज्य शासन व मागासवर्ग आयोगाच्या आदेशाने 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मुंबईत मराठा आरक्षण सर्व्हेक्षणसाठी मुंबई महापालिकेच्या अभियंते, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. ते काम पूर्ण झाले. आता तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी शहर आणि उपनगर यांच्या विनंतीवरून मुंबई महापालिकेने आपल्या विविध खात्यातील 7 हजार 500 अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. यामध्ये, महापालिकेच्या आरोग्य, आपत्कालिन व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पाणी पुरवठा यांसारख्या अत्यंत महत्वाच्या खात्यातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांनाही निवडणूक कामाला जुंपल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (BMC Seven and a half thousand officers and employees of Mumbai Municipality joined for Lok Sabha election work)

लोकसभा निवडणूक कामकाजासाठी खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अखत्यारितील सोबत ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाकरिता त्वरित जिल्हाधिकारी, मुंबई शहर आणि उपनगरे कार्यालयात पाठवावे. यापूर्वी निवडणूक कामाकरिता पाठवलेले कर्मचारी वगळून सोबत जोडलेल्या यादीतील कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यादीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येएवढे कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश महापालिका प्रमुख कामगार अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा : Awhad On Ajit Pawar : आता त्यांनी नाव घ्यावे, ‘एनसीपी- अलिबाबा चाळीस चोर’; आव्हाडांचा टोला

असे असतानाही काही साहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख यांनी ‘ड’ वर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना पाठविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत, अशी तक्रार दि. म्युनिसिपल युनियनचे सर चिटणीस रमाकांत बने यांनी, महापालिका आयुक्त इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे जर युनियनच्या तक्रारीची दखल पालिका प्रशासनाने घेतल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडे चौकशी केली जावी शकते. जर प्रशासनाने युनियनच्या तक्रारीची दखल न घेतल्यास युनियन पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबत विचार करू शकते. त्यामुळे याप्रकरणी तोडगा निघणे आवश्यक झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : CM Shinde: अहो, त्या दाढीवाल्यानेच तुमची गाडी खड्ड्यात घातली; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

वास्तविक, 17 जानेवारी 2024 रोजी भारत निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगरे यांनी मुंबई महापालिकेकडून निवडणूक कामकाजासाठी कर्मचारी उपलब्ध करण्याची विनंती केली होती.

शिक्षणाधिकारी, आरोग्य खात्याचे सर्वाधिक अधिकारी, कर्मचारी

या 7 हजार 500 अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये, शिक्षणाधिकारी खात्याचे 4 हजर 180, आरोग्य खात्याचे 795 कर्मचारी, प्रमुख लेखापाल (वित्त) 350 कर्मचारी, प्रमुख अभियंता (घनकचरा खाते) 300 कर्मचारी, कर निर्धारण व संकलन 190, नगर अभियंता 165, जल अभियंता 153 कर्मचारी, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक)- 140, मुख्य लेखा परिक्षक- 125 कर्मचारी, प्रमुख अभियंता मलनि:सरण प्रकल्प- 115 आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -