घरताज्या घडामोडीपालिकेच्या १०० दवाखान्यांचे बळकटीकरण, १० दवाखान्यांत आधुनिक वैद्यकीय सुविधा

पालिकेच्या १०० दवाखान्यांचे बळकटीकरण, १० दवाखान्यांत आधुनिक वैद्यकीय सुविधा

Subscribe

मुंबई महापालिका यंदाच्या वर्षात मुंबईकरांना प्रमुख रूग्णालयांच्या स्तरावरील अधिकाधिक आरोग्य सुविधा देण्यासाठी १०० दवाखान्यांचे आधुनिकीकरण करणार आहे. त्यापैकी १० दवाखान्यात प्रायोगिक तत्वावर या आरोग्य सुविधा देण्यात येणार असून त्यासाठी योग्य सल्लागार नेमून त्या सल्लागारकडून सल्ला घेण्यात येणार आहे.

पालिका दवाखान्यात रूग्णालय स्तरावरील आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यास पालिकेच्या प्रमुख व सर्वसाधारण रुग्णालयांवरील आरोग्य सुविधांबाबतचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाय नागरिकांना आता कान, नाक, घसा, त्वचा, नेत्र विकार आदींवर उपचार घेण्यासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. मुंबईकरांना आरोग्य सुविधांबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात १०० दवाखान्याच्या ठिकाणी आधुनिक वैद्यकीय सुविधा बहाल करण्याचे वचन दिले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला या वचनाची अंमलबजावणी करण्यासाठी काही तरी कृती करणे आवश्यक होते. त्यानुसार मुंबई महापालिका आरोग्य विभागाने पालिकेच्या १०० दवाखान्यात रूग्णालय स्तरावरील आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार, आता पालिका प्रथम १० दवाखान्यात रूग्णालय स्तरावरील आरोग्य सुविधा उपलब्ध करणार आहे. त्यासाठी मात्र तज्ञ सल्लागाराचे मत जाणून घेण्यात येणार आहे.

“त्या” १० दवाखान्यांची यादी

(१) एच / पश्चिम विभाग गुरुनानक दवाखाना
(२) के /पूर्व विभाग व्ही. व्ही. शिरोडकर दवाखाना
(३) के/ पश्चिम विभागात वाडिया दवाखाना व बनाना दवाखाना
(४) पी/ उत्तर विभाग राथोडी दवाखाना
(५) आर / दक्षिण विभाग शैलजा गिरकर दवाखाना
(६) आर / मध्य विभागात काजूपाडा दवाखाना
(७) आर / उत्तर विभागात वाय.आर. तावडे दवाखाना
(८) एन वार्ड विभागात साईनाथ दवाखाना
(९) एस वार्ड विभागात टागोरनगर दवाखाना
(१०) डीडीयू मार्ग दवाखाना

- Advertisement -

हेही वाचा : पालिका रुग्णालयात टनेल लाँड्रीच्या नावाखाली भ्रष्टाचार; भाजपकडून कारवाईची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -