राशीभविष्य: शनिवार २३ एप्रिल २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तुमचा उत्साह वाढेल. आत्मविश्वासाने विचार मांडता येतील. धंद्यात प्रेमाने वागा व बोला.

वृषभ :- धंद्यात मोठी ऑफर मिळेल. ओळखीचा फायदा होईल. मान-सन्मान मिळेल. स्पर्धा जिंकाल

मिथुन :- धंद्यात खर्च होईल. डोळ्यांची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल.

कर्क :- घरात क्षुल्लक कारणावरून वाद होईल. गैरसमज होईल. मौल्यवान वस्तू हरवू नका.

सिंह :- आजच्या कामाला सर्वांची मदत होईल. उत्साह राहील. मुलांच्या समस्या सोडवता येतील.

कन्या :- महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन येईल. कला क्षेत्रात काम मिळेल. नवीन ओळख उपयोगी पडेल.

तूळ :- कोर्ट कचेरीच्या कामात जिंकाल. कला क्षेत्रात मन रमून जाईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

वृश्चिक :- गुप्त कारवायांचा त्रास होईल. विरोधाने विरोध अधिक वाढतो. वातावरण उग्र होईल. संयम ठेवा.

धनु :- आजच्या दिवसात तुमची कामे वेगाने पूर्ण होतील. योग्य व्यक्तीची भेट झाल्याने तणाव कमी होईल.

मकर :- मानसिक दडपण येईल. आपण केलेले प्रयत्न फुकट गेले असे वाटेल. तुम्हाला दूषण दिले जाईल.

कुंभ :- आज तुमचा उत्साह राहील. धंद्यासंबंधी चर्चा करता येईल. प्रेमाला चालना मिळेल.

मीन :- माणसाने नेहमीच सावध भूमिका घ्यावी, म्हणजे मोठे नुकसान होत नाही. तुमचा अंदाज खरा ठरेल.