घरमुंबईपालिका रुग्णालयात टनेल लाँड्रीच्या नावाखाली भ्रष्टाचार; भाजपकडून कारवाईची मागणी

पालिका रुग्णालयात टनेल लाँड्रीच्या नावाखाली भ्रष्टाचार; भाजपकडून कारवाईची मागणी

Subscribe

पालिकेच्या अधिकाऱ्याने १६ कोटी रुपये घेतल्याचा आरोप, निविदा रद्द करून 'त्या' अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात रुग्णांच्या कपड्यांची धुलाई व स्वच्छता करण्यासाठी पालिका खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून १६० कोटी रुपये खर्चून ‘टनेल लाँड्री’ उभारणार आहे. मात्र त्यासाठी निविदा प्रक्रिया करताना संबंधित अधिकाऱ्याने १६ कोटी रुपये घेतले आहेत. त्याचे पुरावे आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. सदर ‘टनेल लाँड्री’ ची निविदा प्रक्रिया रद्द करून ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

त्यामुळे पालिकेच्या या ‘टनेल लाँड्री’ उभारणी होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया व संबंधित अधिकारी अडचणीत आल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी आपण अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्यासाठी कंत्राटदाराला १६० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मात्र ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेतले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार हा कंत्राट काढण्यासाठी आपल्या एका अधिकाऱ्याने १६ कोटीची रक्कम स्वीकारली आहे. त्याचे सविस्तर पुरावे मी वेळ आल्यावर तपास यंत्रणेला सादर करेन, असा दावा आमदार साटम यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

- Advertisement -

या १६० कोटीच्या टनेल लाँड्रीचा अभ्यास केल्यास माझ्या आरोपात किती तथ्य आहे हे आपणास लक्षात येईल. कारण कुठलेही तंत्रज्ञान, टेकनिकल स्पेसीफिकेशन किंवा अनुभव याबाबत यात कुठलीही एकसुत्रता नाही. तसेच, या प्रकरणी कंत्राटदाराला अधिक लाभ मिळण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. जेंव्हा नविदा निघते तेंव्हा एमसीजीएम आणि सीव्हीसी गाईडलाईन नुसार संबधित कंपनीच्या कामांचाच अनुभव ग्राह्य धरला जातो. परंतु ही मार्गदर्शक तत्वे धाब्यावर बसवून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या व विदेशातील कंपन्यांनाचाही मार्ग सुकर करण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ही टनेल लाँड्री क्षयरोगाचे रुग्णालय परिसरात उभारण्यात येणार आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जर क्षयरोग रुग्णालयात टनेल लाँड्री बनवून तिथे कपडे धुवून व सुकवून पाठवले तरी त्याद्वारे जंतूसंसर्ग होणारच नाही, याची हमी आरोग्य विभाग देणार आहे का? आणि या भितीपोटीच आरोग्य विभागाने ही परवानगी दिली नसल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. जर आरोग्य विभागाला ही भीती वाटत असेल तर त्याठिकाणी टनेल लाँड्री उभारण्याचा हट्ट धरुन भविष्यात रुग्णालयातील विविध आजारांनी ग्रासलेले रुग्ण आणि डॉक्टर यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का केला जात आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार ‘मराठी भाषा भवन’ निर्मितीचे काम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -