घरमुंबईएसटीच्या अतिवेगाला लागणार ब्रेक

एसटीच्या अतिवेगाला लागणार ब्रेक

Subscribe

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही आणि शिवनेरीच्या बसचालकांकडून सर्रासपणे वेगमर्यादेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वृत्त दै.‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. त्यानंतर झोपी गेलेल्या एसटी महामंडळाला खळबळून जाग आली आहे. राज्यभरातील सर्व एसटी चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी बस प्रतितास 80 कि. मी. पेक्षा जास्त वेगाने चालताना सापडल्यास चालकाचे लायसन्स 3 महिने निलंबित करण्यात येईल. तसेच स्पीड लॉक केलेल्या बसेस चालकांनी अनलॉक केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खासगी वाहनांच्या भरधाव वेगाला लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांसह राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, तर दुसरीकडे राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही आणि शिवनेरीच्या बसचालकांकडून सर्रासपणे वेगमर्यादांच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. याविरोधात गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या तक्रारीदेखील वाढल्या होत्या. विशेष म्हणजे, याविरोधात मुंबई-पुणे महामार्ग पोलिसांकडून एसटी महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. तरीसुद्धा एसटी महामंडळाच्या बसेस वेग नियंत्रणाचे उल्लंघन करत होते. या विषयीचे वृत्त ‘आपलं महानगर’ने १ फेबुवारी २०१९ ला “शिवशाही चालकांची रॅश ड्रायव्हिंग पोलिसांसाठी डोकेदुखी” या मथळ्याखाली प्रकाशित केले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने याची दखल घेत स्वारगेट आगर पुणे यांनी एसटी बस चालकांसाठी एक सूचनापत्र काढले. त्या माध्यमातून चालकांना कारवाईची कल्पना देण्यात आली.

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर शिवशाही आणि शिवनेरीचे चालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे. महामार्गावर जास्तीत जास्त अपघात हे अतिवेगाने वाहन चालवून वाहनावरील चालकांचे नियंत्रण सुटून झालेले आहेत. वाहन चालवताना त्यामध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांची जबाबदारी त्या बसचालकांवर असते, परंतु बसचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करून सर्व प्रवाशांचे जीव धोक्यात घालतात. त्यामुळे एसटी मंहाडळाने आपल्या चालक वाहकांना वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत, नाहीतर महामार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. असे अनेक वेळा महामार्ग पोलिसांकडून पत्र देण्यात येत होते. तरीसुद्धा एसटीचे बस चालक ते गंभियार्ंने घेत नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -