घरमुंबईभिवंडीतील कालवार रेल्वे पुलाची दुरवस्था; नागरिकांचा जीव धोक्यात

भिवंडीतील कालवार रेल्वे पुलाची दुरवस्था; नागरिकांचा जीव धोक्यात

Subscribe

मुंबईतील रेल्वे पुलाची दुर्घटना झाल्यानंतर भिवंडीतील रेल्वेपुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यातील अंजूरफाटा,कालवार रेल्वे पुलांची दुर्दशा झाली आहे. या बाबतीत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी देऊनही त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मुंबईतील रेल्वे पुलाची दुर्घटना झाल्यानंतर भिवंडीतील रेल्वेपुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यातील अंजूरफाटा,कालवार रेल्वे पुलांची दुर्दशा झाली आहे. या बाबतीत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी देऊनही त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दिवा- वसई रेल्वेमार्गावर भिवंडी रोड,खारबाव,कामण ही रेल्वे स्थानके असून भिवंडीतील छोट्या मोठ्या गावांत रेल्वेने पूल बांधले आहेत. मुंबईत रेल्वे पुलाच्या दुर्घटनेनंतर शासनाने रेल्वे पुलांचे सर्व्हेक्षण करून दुरूस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
भिवंडी तालुक्यातील कालवार रेल्वे पुलाच्या दुर्दशेबाबत ग्रामस्थांनी पत्रव्यवहार करून या पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दिवा- वसई मार्गावर लोकल सुरू होण्यापूर्वी या रेल्वे मार्गावरून मालगाड्या सुरू झाल्या होत्या. सध्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या प्रवासी एक्सप्रेस रेल्वे गाड्या आणि मालगाड्यांचे प्रमाण वाढलेले आहे. अशा स्थितीत रेल्वे मार्गादरम्यानचे पूल दुरूस्त करणे आवश्यक आहे. भिवंडी तालुक्यातील कालवार ग्रामपंचायत हद्दीत रेल्वेने बांधलेल्या पुलाचे प्लास्टर निखळून पडले असून पुलासाठी वापरलेल्या लोखंडी सळई गंजलेल्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. या पुलाखालून गावातील नागरिकांची वर्दळ सुरू असते.नादुरूस्त कालवार पुलावर अपघात झाल्यास रेल्वे प्रवाशांसह कालवार गावाच्या ग्रामस्थांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा पूल लवकर दुरूस्त करावा अशी मागणी नागरीक करीत आहेत.

या नादुरूस्त पुलाची दुरूस्ती करण्यासाठी कालवार ग्रामपंचायतीने रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र संबंधित विभागाने अजूनही याची दखल घेतलेली नाही.
– देवानंद पाटील, कालवार ग्रामपंचायतीचे सरपंच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -