घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘जेल तर जेल, दोन फटक्यात गेम’; खून केल्यानंतर आरोपीचे इंस्टाग्राम लाईव्ह

‘जेल तर जेल, दोन फटक्यात गेम’; खून केल्यानंतर आरोपीचे इंस्टाग्राम लाईव्ह

Subscribe

Nashik Crime नाशिक : जेल तर जेल, लाईव्हला यायचा ना, तो गेला दोन फटक्यात हा फिल्मीस्टाईल संवाद आहे, गुरुवारी (दि.२५) सायंकाळी भाजीविक्रेता संदीप आठवले (brutal murder) खूनप्रकरणातील संशयित आरोपी ओम्या खटकीचा. या संवादाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ओम्या खटकीने खूनाच्या घटनेनंतर एका तासात लाईव्ह केला. विशेष म्हणजे तो व्हिडीओ १२२ हून अधिक यूजर्सने लाईव्ह पाहिल्याचे समोर आले आहे.

भाजीविक्रेता संदीप आठवलेच्या खूनाचा थरार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. संदीपने व्हिडीओ रेकॉर्ड करत केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मुख्य संशयित आरोपी ओम्या खटकीने साथीदारांच्या मदतीने खूनाचा प्लॅन आखला. आठ जणांनी संगनमत करत अंबडमधील शिवाजी चौकात संदीपवर गुरुवारी (दि.२४) धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यात संदीपचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ओम्या खटकीने सोशलमीडियावर व्हिडीओ अपलोड करत जेल तर जेल, दोन फटक्यात केला गेम, असे म्हटले असून, त्यावेळी ११२ यूजर्स ऑनलाईन असल्याचे समोर आले आहे. काहीजणांनी त्याच्या व्हिडीओला कमेंटसुद्धा दिल्या आहेत.

- Advertisement -

ओम प्रकाश पवार ऊर्फ मोठा ओम्या खटकी, ओम चौधरी ऊर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे ऊर्फ मॅगी मोर्‍या, अनिल प्रजापती, बाळा वडनेरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपींना शुक्रवारी (दि.२५) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार (दि. २८) पर्यंत पोलीस
कोठडी सुनावली.

संदीपला मारहाण करत व्हिडीओ व्हायरल करणे बेतले जीवावर

१६ जुलै रोजी गटारी आमावस्येच्या दिवशी ओम्या खटकीला मृत संदीप आठवले याने पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये घुसत मारहाण करत बाहेर काढले. त्यावेळी संदीपने ओम्या खटकीला मारहाण करत व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ संदीपने सोशल मीडियावर व्हायरल केला. मारहाण आणि व्हिडीओ काढल्याचा ओम्या खटकीला राग आला होता. त्यातून ओम्या खटकीने संदीपचा काटा काढल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

लाईव्हवेळी बॉस, खटकी भाई नावाच्या कमेंट

गुरुवारी (दि.२४) सायंकाळी ४.४५ वाजेदरम्यान ओम्या खटकी व छोट्या खटकीसह आठ जणांनी मारहाणीचा बदला घेण्यासाठी संदीप आठवलेवर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर सर्वजण फरार झाले होते. खूनाच्या एक तासानंतर ओम्या खटकीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह केले. त्यामध्ये तो म्हणाला, जेल तर जेल, लाईव्हला यायचा ना तो, तो गेला दोन फटक्यात. यावेळी १२२ हून अधिक युजर्स त्याला लाईव्ह बघत होते. तसेच, त्या लाईव्हवर बॉस, खटकी भाई, ओन्ली खटकी, ओनली ओम्याभाई, एकच फाईट वातावरण टाईट, डार्लिंग, जान अशा स्वरुपाच्या कमेंट यूजर्सने दिल्या असल्याचे पोलीस तपासात समोर आहे.

पोलीस आहेत कुठे?

नाशिक शहरात खून, हाणामारीसह लूटमार, हॉटेलमध्ये घुसून मारहाण हानीच्या घटना घडत आहेत. शहरात पोलिसांचे पेट्रोलिंग नसल्याने हल्लेखोरांसह चोरट्यांचे धाडस वाढत आहेत. पोलिसांनी पेट्रोलिंगवर भर देत नसल्याने गल्लोगल्ली भाई निर्माण होत असून, सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत आहेत. ही बाब काही पोलिसांना माहिती असली तरी अर्थपूर्ण हितसंबंधामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, शहरात सराईत गुन्हेगार तयार होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -