घरमुंबईमध्य रेल्वे विस्कळीत; कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

मध्य रेल्वे विस्कळीत; कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Subscribe

खर्डी, आटगाव स्टेशनवर लोकल आणि एक्स्प्रेस रखडल्या आहेत. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. उंबरमाळी येथे कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे कसाऱ्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी आणि कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. खर्डी, आटगाव स्टेशनवर लोकल आणि एक्स्प्रेस रखडल्या आहेत. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कसाऱ्याहून दुसरं इंजिन मागवून एक्स्प्रेस पुढे नेणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -