घरमुंबईCET परिक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; MBA, MHT CET, LLB परिक्षांचे वेळापत्रक पाहा

CET परिक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; MBA, MHT CET, LLB परिक्षांचे वेळापत्रक पाहा

Subscribe

१४ प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

राज्य सीईटी सेलतर्फे बुधवारी तब्बल १४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात प्रामुख्याने एमएचटी सीईटी परीक्षाचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले असून यंदा एमएचटी सीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिलला होणार आहे. त्याचबरोबर तर एमबीएची सीईटी 14 आणि 15 मार्च रोजी होणार आहे. एलएलबी तृतीय वर्ष 28 जून आणि एलएलबी 5 वर्ष 12 एप्रिल रोजी होणार आहेत.

राज्य प्रवेश परीक्षा कक्षाची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासमावेत आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा 13 ते 23 एप्रिल, 2020 या कालावधीत होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या संदर्भातील सीईटी वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. तीन व पाच वर्षीय विधी (लॉ), बीई / बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर , हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड कोर्स आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या परीक्षांच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यानी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा असे आवाहन सीईटी सेल आयुक्त संदीप कदम यांनी केले आहे.

- Advertisement -

अशा होणार परीक्षा

एमएचटी सीईटी – 13 ते 23 एप्रिल 2020
एमबीए/एमएमएस- 14 आणि 15 मार्च 2020
एमसीए – 28 मार्च 2020
मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट – 16 मे 2020
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट – 10 मे 2020
एलएलबी 5 वर्षे – 12 एप्रिल 2020
एलएलबी 3 वर्षे – 28 जून 2020
बीपीएड- 11 मे 2020
बीएड / एमएड – 12 मे 2020
एमपीएड – 14 मे 2020
बीए / बीएससी बीएड – 20 मे 2020
एमएड- 26 मे 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -