घरमुंबईChakankar On Awhad : तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा! चाकणकरांचा थेट...

Chakankar On Awhad : तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा! चाकणकरांचा थेट हल्लाबोल

Subscribe

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करुन सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदारांवर शरद पवार गटाकडून टीका केली जाते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार या ना त्या कारणाने शरद पवारांच्या वयाचा उल्लेख प्रत्यक्षरित्या करतच असतात.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रविवारी (4 फेब्रुवारी) बारामती येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जहरी टीका केली. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. आव्हाडांच्या टीकेला मात्र, दादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तेलघाले आव्हाड आता तुम्ही गप्पच बसा अस म्हणत आव्हाडांचा खरपूस समाचार घेतला आहे. (Chakankar On Awhad Telghale Awhad you should shut up now Chakankars direct attack)

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करुन सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदारांवर शरद पवार गटाकडून टीका केली जाते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार या ना त्या कारणाने शरद पवारांच्या वयाचा उल्लेख प्रत्यक्षरित्या करतच असतात. अशातच आज बारामतीमध्ये आयोजित सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता म्हणाले की, काहीजण तुमच्याकडे येतील. भावनिक होतील, म्हणतील की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. खरंच त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार हे माहिती नाही. असं म्हणत अजित दादांनी त्यांचे काका शरद पवार यांची खिल्लीही उडवली. अजित पवार म्हणाले, तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा : BMC Budget 2024 : महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी 508 कोटींची तरतूद

- Advertisement -

दरम्यान या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दादांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य आहे? काकांच्या मृत्यूची वाट बघत आहात. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता? अजित पवार यांनी आज हद्दच ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता, येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आपली उंची ओळखा. कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती, असा रागच आव्हाडांनी व्यक्त केला. त्यांच्या या टीकेला दादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : Raigad Politics : पेणमध्ये कार्यकर्त्यांकडून लोकसभेसाठी धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणाबाजी

काय म्हणाल्या चाकणकर?

अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट लिहित आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचे काम करत आहेत. अजितदादा यांच्या बोलण्याचा मतितार्थ वेगळा काढून लोकांची दिशाभूल करू नका. लोक हुशार आहेत, त्यांना दुधात मिठाचा खडा टाकणारे आव्हाड सहज कळतात. त्यामुळे तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा! अशा शब्दांत त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -