घरमुंबईमहापालिका मुख्यालय व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचे रुपडे पालटणार

महापालिका मुख्यालय व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचे रुपडे पालटणार

Subscribe

पादचाऱ्यांना अधिक सुरक्षितपणे, सुलभतेने व सहजतेने चालता यावे, यासाठी या परिसरातील पादचारी मार्गांमध्ये महत्त्वपूर्ण व सकारात्मक बदल प्रायोगिक स्वरुपात करण्यात येणार आहेत.

जागतिक वारसास्थळ असणारे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस व मुंबई महापालिका मुख्यालय यांच्या परिसरात असणाऱ्या रस्त्यांचे रुपडे लवकरच पालटणार आहे. या दोन्ही ऐतिहासिक इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांची ये-जा असते. यामध्ये पर्यटकांसह, चाकरमान्यांचाही समावेश असतो. या पादचाऱ्यांना अधिक सुरक्षितपणे, सुलभतेने व सहजतेने चालता यावे, यासाठी या परिसरातील पादचारी मार्गांमध्ये महत्त्वपूर्ण व सकारात्मक बदल प्रायोगिक स्वरुपात करण्यात येणार आहेत. यामध्ये नाविन्यपूर्ण प्रकारच्या अनेक आकर्षक बदलांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या प्रायोगिक प्रकल्पाचे काम आजपासून सुरु करण्यात येत असून ते केवळ एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर या भागाचे रुपडे पालटलेले दिसणार आहे.

पादचारीभिमुख वाहतुक व्यवस्था

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व ‘ब्लूमबर्ग फिलॅन्ट्रॅाफिज इनिशिएटिव्ह’ (BIGRS) यांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात वर्ष २०१५ पासून विविध सुधारणा राबविल्या जात आहेत. यामध्ये विविध जनजागृती अभियानांसह रस्ते व पदपथ विषयक विविध अभ्यासपूर्ण अभियांत्रिकीय सुधारणांचाही समावेश आहे. याच सुधारणांचा भाग म्हणून आता ‘मुंबई ट्रॅफिक कंट्रोल ब्रँच’ (MTCB), आणि ‘सिटी ट्रान्सपोर्टेशन ऑफीशियल्स – ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह’ (NACTO – GDCI) यांचे सहकार्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व मुंबई महापालिका मुख्यालयालगतच्या परिसरातील रस्त्यांवर पादचारीभिमुख वाहतुक व्यवस्था करण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रायोगित स्तरावर प्रकल्प राबवणार

न्यूयॉर्कच्या शहर वाहतूक विभागाच्या माजी आयुक्त व ‘ब्लूमबर्ग असोसिएट्स’ च्या प्राचार्या जेनेट सादिक-खान यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबई शहराला भेट दिली होती. त्यांच्या भेटीदरम्यान या प्रकल्पाची उद्घोषणा करण्यासह या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने ‘ग्लोबल स्ट्रीट डिझाईन गाईड’ (GSDG) स्वीकारले होते. त्याअंतर्गत असणाऱ्या मार्गदर्शक तत्वांनुसार व ज्या परिसरात हा प्रकल्प राबवावयाचा आहे, त्या परिसराचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाहतुकीला अडथळा येणार नाही

वरील तपशिलानुसार करण्यात येणाऱ्या सुधारणा या रस्त्यांच्या ज्या भागाचा वापर वाहतुकीसाठी अत्यल्प प्रमाणात होते, असे भाग पादचाऱ्यांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. तसेच पादचाऱ्यांना रस्ते ओलांडणे सुलभ व्हावे, यासाठी ठिकठिकाणी विस्तीर्ण ‘झेब्रा क्रॉसिंग’ देखील करण्यात येणार आहेत. यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे व सुलभतेने चालण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. मात्र, हे करताना वाहतूकीसाठी अत्यल्प प्रमाणात वापर होणाऱ्या जागांचाच विचार झाला असल्याने वाहनांच्या वाहतुकीला कोणताही अडथळा न येता उपलब्ध जागेचाच अधिक चांगला व पर्यायी वापर होणार आहे.

- Advertisement -

आठवड्याभरात रुपडे पालटणार

या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे व ठळक वैशिष्ट्य म्हणजे या प्रायोगिक प्रकल्पात केल्या जाणाऱ्या सुधारणांमध्ये भविष्यात काही बदल करावयाची आवश्यकता भासल्यास ती सहजपणे करणे, शक्य होणार आहे. या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या सुधारणा या सविस्तर अभ्यासाअंती करण्यात येत आहेत. या सुधारणांसाठीच्या कामांची सुरुवात आजपासून करण्यात येणार असून पुढील साधारणपणे आठवड्याभरात या भागाचे रुपडे पालटणार आहे.

नागरिकांच्या मतांवरुन पुढील दिशा ठरवणार

प्रायोगिक स्तरावर करण्यात येणाऱ्या या सुधारणांना मिळणाऱ्या प्रतिसादाचा शास्त्रीय पद्धतीने नियमित अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांची मते व प्रतिक्रिया विचारात घेऊन या प्रायोगिक प्रकल्पाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती ‘ब्लूमबर्ग फिलॅन्ट्रॅाफिज इनिशिएटिव्ह’ यांच्याद्वारे देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -