घरदेश-विदेशसंधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा..., चित्रा वाघ यांची कवितेतून टीका

संधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा…, चित्रा वाघ यांची कवितेतून टीका

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आव्हान देण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. त्यांची तिसरी बैठक मुंबईत सुरू आहे. त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी, संधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा… ही कविता ट्वीट करून निशाणा साधला आहे.

- Advertisement -

देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.

हेही वाचा – ‘वन नेशन वन इलेक्शन’पेक्षा फेअर इलेक्शन घ्या, संजय राऊत यांनी मोदी सरकारला सुनावले

- Advertisement -

आता ‘इंडिया’ नामक विरोधकांच्या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीत समन्वयकाबाबत निर्णय घेण्यात येणार असून सोबतच मुख्य समन्वय समितीसह रिसर्च समिती, प्रचार समिती, कार्यकारी गट असे विविध बाबींवर चर्चा होणार आहे. तथापि, इंडिया आघाडीच्या लोगोवर आज, शुक्रवारी निर्णय होणार नसून तो येत्या दोन दिवसांत होणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा – One Nation-One Election : मोदी सरकार आणणार ‘एक देश – एक निवडणूक’ विधेयक, काय आहे फायदे-तोटे

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी एक कविता ट्वीट करत ‘इंडिया’वर टीका केली आहे. या ट्वीटमध्ये त्या म्हणतात –

घमंडिया आघाडीचा खेळ भरलाय न्यारा
संधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा

इथं कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ
पण, हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ

पोटात एक अन् ओठात एक, कसले पुरोगामी नि कसले डावे
खुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळे, अशा घोटाळेबाजांना काय म्हणावे?

जनतेच्या ऊरावर बसलीत केव्हापासून ही भ्रष्ट घराणी
पाप धुण्याही कमीच पडेल या अरबी समुद्राचे पाणी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -