घरमुंबईसांताक्रुझ: सफाई कामगारांच्या घरावर १५ मजली इमारत बांधली जाणार

सांताक्रुझ: सफाई कामगारांच्या घरावर १५ मजली इमारत बांधली जाणार

Subscribe

मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील न्यू हसनाबाद लेन येथील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांसाठी असलेल्या वसाहतीचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत करण्यात येत आहे. या वसाहतीच्या जागी १५ मजली इमारत बांधली जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून यावर २८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

महापालिकेच्या एच/पश्चिम अर्थात सांताक्रुझ पश्चिम येथील न्यू हसनाबाद लेन येथे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पुनर्विकासादरम्यान एकूण ६९० सदनिका तयार होणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यात एक इमारत असून दोन विंगमध्ये १२० सदनिका बांधल्या जाणार आहेत. तर दुसर्‍या टप्प्यात २७० सदनिका आणि तिसर्‍या टप्प्यात ३०० सदनिका बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात स्टील्ट अधिक १५ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यातील तळ मजल्यावर वाहनतळ आहे. तसेच एका सदनिकेचे चटई क्षेत्रफळ हे ३०० चौरस फुटांचे आहे. एका सदनिकेसाठी १७ लाख ४८ हजार रुपये एवढा खर्च होणार आहे.

- Advertisement -

सफाई कामगारांची सेवानिवास्थाने असलेल्या वसाहतींचा पुनर्विकास हा आश्रय योजनेतंर्गत राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी ही योजना कासव गतीने सुरु आहे. पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या सिध्दार्थ नगर, कोचिन स्ट्रीट आणि पॉवेल्स लँडसह दादर गौतम नगर, दादर कासारवाडी आणि टँक पाखाडी प्रकल्पांची काम धिम्यागतीने सुरु आहे. यापैकी काही वसाहतींमध्ये केवळ संक्रमण शिबिरांचे काम सुरु झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -