घरठाणे'प्रभात'च्या स्वच्छता मोहिमेमुळे शिंदे कुटुंबात परतला 'प्रकाश'

‘प्रभात’च्या स्वच्छता मोहिमेमुळे शिंदे कुटुंबात परतला ‘प्रकाश’

Subscribe

आज देशभरामध्ये स्वच्छता अभियान राबविले गेले. एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील प्रभात ट्रस्ट या नाका कामगारांसाठी कार्यरत संस्थेच्या वतीने नाका कामगारांच्या निवारा शेडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रभातचे स्वयंसेवक सकाळी साडेआठ वाजता रबाळे रेल्वे स्थानकाजवळील कामगार नाक्यावर पोहोचले.

मुंबई : मुलुंड येथील रहिवासी असणारे प्रकाश शिंदे ज्येष्ठ नागरिक बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या परिवाराने त्यांना शोधण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला मात्र, ते आढळून आले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली.. परंतु प्रयत्न नाही यश येत नव्हते. मात्र, आज ‘प्रभात’च्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे हरवलेले ज्येष्ठ नागरिक प्रकाश शिंदे त्यांच्या कुटुंबीयांना भेटल्याने जणूकाही शिंदे कुटुंबात निर्माण झालेल्या अंधारात ‘प्रकाश’च परतल्याचे दिसून येत होते. (Prakash returns to Shinde family due to Prabhats cleanliness drive)

हेही वाचा : गडकिल्ले, धार्मिक स्थळांच्या परिसरातही स्वच्छता आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

आज देशभरामध्ये स्वच्छता अभियान राबविले गेले. एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील प्रभात ट्रस्ट या नाका कामगारांसाठी कार्यरत संस्थेच्या वतीने नाका कामगारांच्या निवारा शेडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रभातचे स्वयंसेवक सकाळी साडेआठ वाजता रबाळे रेल्वे स्थानकाजवळील कामगार नाक्यावर पोहोचले. स्वच्छता अभियानात सहभागी झालेले जीवन निकम यांनी या ठिकाणी रात्री निवार्‍याला असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाशी चर्चा केली. त्यातून ते घरातून हरविले असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा व्हिडिओ मिसिंग हेल्पलाइनवर देऊन पोलिसांच्या मदतीने त्यांचे घर शोधण्याचा प्रयत्न केला. याच महिन्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पोलिसांकडून अभियान राबविण्याची तयारी सुरू असताना रबाळे पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक रोहन वैती व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी कुलकर्णी, दवणे व भोसले यांच्या पथकाने तत्परतेने शोध मोहीम राबविली.

हेही वाचा : मराठीचा मद्दा पुन्हा एकदा पेटला; मुलुंडनंतर आता कांदिवलीत जागा हडपण्याचा प्रयत्न

- Advertisement -

…आणि प्रकाश शिंदे कुटुंबासोबत घरी गेले

मुलुंड स्थानकात दाखल झालेल्या मिसिंग तक्रारीच्या आधारे त्यांच्या परिवाराशी संपर्क साधून या ज्येष्ठ नागरिकाची पुनर्भेट घडवून आणली.. या भेटीनंतर त्यांचे नातू कार्तिक बनसोडे यांनी प्रभात टीमशी संपर्क साधून त्यांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -