घरमुंबईआयुक्‍त संजीव जैस्वाल वादाच्या भोवर्‍यात

आयुक्‍त संजीव जैस्वाल वादाच्या भोवर्‍यात

Subscribe

व्हॉटसअॅप वरील शिवीगाळीचे पडसाद

ठाणे महापालिका आयुक्तांच्या व्हॉटसअॅप व्हायरल झालेल्या एका संदेशाचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले आणि सभा अर्धा तास तहकूब झाली. महापालिका अधिका-यांच्या बदल्यांवरून संतप्त झालेल्या आयुक्तांनी अधिका-यांच्या अधिकृत ग्रुपवर आपला राग व्यक्त केला. हा राग व्यक्त करताना अधिका-यांच्या कुटुंबियांतील महिलांबद्दलही आयुक्तांनी अपशब्दाचा वापर केल्याने वादंग उठला.यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा नेमका अर्थ काय हे सभागृहाला समजले पाहिजे अशी मागणी भोईर यांनी केली.ज्या ग्रुपवर महिला अधिकारीही आहेत त्या ग्रुपवर एखाद्या अधिका-याच्या आया-बहिणींविषयी असे विधान करणे योग्य नसल्याचे सांगत या प्रकाराचा निषेध केला

विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनीही याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी पालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांना असा काही प्रकार झाला आहे का याचा खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिका सचिव बुरुपल्ले यांनी या प्रकाराला दुजोरा देत याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. अखेर सभागृहातील महिला नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली.

- Advertisement -

जैस्वाल वि.नगरविकास मंत्री वाद पेटणार?                                                                                  महापालिकेतील अंतर्गत बदल्यावरून पेटलेला वाद आता शिगेला पोहचला असून आयुक्त विरुद्ध नगरविकास मंत्री अशी लढाई रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आयुक्त जैस्वाल यांनी केलेल्या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी बदल्या रद्द केल्या. मात्र ज्या अधिकार्‍यांनी नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती, त्यांना मात्र त्यांनी पालिका अधिकार्‍यांच्या ग्रुप वर शिवीगाळ केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे बदल्या रद्द केल्याचा राग आयुक्तांना असल्याचे बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -