घरCORONA UPDATELockDown : ठाण्यात कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

LockDown : ठाण्यात कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

Subscribe

ठाण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतर ठिकाणी राज्य सराकारच्या आदेशाप्रमाणे मिशन बिगिन अगेन अंतर्गत नियम लागू करण्यात आल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिले आहेत. उद्या, १९ जुलैपासून ठाण्यातील लॉकडाऊन संपणार होते. मात्र आता कंटेन्मेंट झोन वगळता ठाण्यात इतर ठिकाणी मिशन बिगिन अगेनचे नियम लागू करण्यात आले आहेत.

ठाणे महापालिका आयुक्तांनी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन वाढवण्याची आवश्यकता आहे, असे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा सांगितले आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाउन हा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांच्या आकडेवारीचा विचार केला, तर ठाण्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाण्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५४७ इतका झाला आहे. याशिवाय ३४२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एकाच दिवसांत १ हजार २७७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे ही प्रशासनासाठी आणि ठाणेकरांसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे. सध्या ठाणे शहरमध्ये एकूण ५ हजार ३२४ रुग्ण उपचार घेत आहेत, तर एकूण ९ हजार ६४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ठाण्यात १८ जुलैपर्यंत एकूण ६७ हजार ६१६ चाचण्या घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा –

Corona Update: राज्यात २४ तासांत ८,३४८ नवे रूग्ण; १४४ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -