घरदेश-विदेशRajasthan politics : अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना दिली आमदारांची यादी

Rajasthan politics : अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना दिली आमदारांची यादी

Subscribe

राजस्थानचे (cm ashok gehlot) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज सायंकाळी (governor) राज्यपाल (kalraj mishra) कालराज मिश्रा यांची भेट घेतली. जयपूर येथील (rajbhavan) राजभवनात ही भेट पार पडली. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १०२ आमदारांच्या समर्थनाचा दावा राज्यपालांकडे केला. त्यांनी १०२ आमदारांच्या समर्थनाची यादी राज्यापालांना सुपूर्द केली. दरम्यान, आज भारतीय ट्रायबल पार्टी (bpt) च्या आमदारांनीही अशोक गेहलोत यांची भेट घेऊन त्यांना समर्थनाचे पत्र दिले.

- Advertisement -

बहुमत सिद्ध करण्याकरता काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षासह १०० आमदार आहेत. भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर अशोक गेहलोत यांच्याकडे १०२ इतक्या आमदारांचे समर्थन आहे. राजस्थानच्या २०० सदस्यिय विधानसभेत सरकार स्थापनेसाठी १०१ आमदारांच्या समर्थनाची आवश्यकता आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलेल्या बंडामुळे राजस्थानमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्यपद्धतीवर सचिन पायलट नाखुश असून त्यांनी बंडाळीचे हत्यार हाती घेतले. त्यानंतर राज्यातील काँग्रेस सरकार राहणार की जाणार यावर तर्कवितर्क सुरू झाले. सचिन पायलट हे भाजपच्या वाटेवर असून त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली असल्याचेही म्हटले गेले. मात्र आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्वतः सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा –

LockDown : ठाण्यात कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -