घरमुंबईएलिमेंटरी परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीत गोंधळ

एलिमेंटरी परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीत गोंधळ

Subscribe

पहिल्याच दिवशी तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कला संचालनालयाकडून शासकीय रेखा कला परीक्षेतील फक्त एलिमेंटरी परीक्षा २२ व २३ फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षेसाठीच्या नोंदणीसाठी १२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण मिळतात. त्यामुळे चित्रकलेमध्ये आवड असणारे अनेक विद्यार्थी दरवर्षी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा देत असतात. त्यानुसार यावर्षी कला संचालनालयाकडून २२ व २३ फेब्रुवारीला ऑनलाईन पद्धतीने फक्त एलिमेंटरी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना १२ ते २० फेब्रुवारीदरम्यान नोंदणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून १२ फेब्रुवारीला नोंदणीला सुरुवात केली असता संकेतस्थळ हँग होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही परीक्षा देणारे विद्यार्थी हे सातवी ते दहावीचे असतात. त्यामुळे दरवर्षी परीक्षेसाठीची विद्यार्थ्यांची नोंदणी ही शाळेमार्फत करण्यात येते. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना स्वत: नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. बहुतांश मुलांना ऑनलाईन नोंदणीबाबत कोणतीही माहिती नाहीत. त्यातच नोंदणीसंदर्भात कोणतेही प्रशिक्षण नसल्याने त्यांना अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून चित्रकलेच्या शिक्षकांकडे करण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -