घरमुंबईCongress : देशात परिवर्तनाचे वारे, मोदी सरकारच्या पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार; काँग्रेसचा...

Congress : देशात परिवर्तनाचे वारे, मोदी सरकारच्या पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार; काँग्रेसचा निर्धार

Subscribe

राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत जवळपास अडीच तास सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद आहे, त्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार असेल, जागा वाटप हे मेरिटनुसारच होणार आहे.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची तयारी झाली असून, मित्रपक्षांबरोबरचे जागा वाटप, संघटनेची तयारी, प्रचारातील मुद्दे यांवर राज्य निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपा, वंचित बहुजन आघाडीसह एकत्रितपणे निवडणुक लढवण्याची तयारी आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना असून मविआ लोकसभेच्या 42 जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. (Congress Winds of change in the country Maharashtra will lay the foundation for Modi governments defeat Determination of Congress)

राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत जवळपास अडीच तास सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद आहे, त्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार असेल, जागा वाटप हे मेरिटनुसारच होणार आहे. त्यात कोणतेही मतभेद नाहीत. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकूल असून, परिवर्तनाचे वारे वाहत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Eknath Khadse : लोकसभेपूर्वी नाथाभाऊ स्वगृही परतणार? चर्चांना उधाण

शेतकरीविरोधी, तरुणांचा अपेक्षाभंग करणारे, महागाई, बेरोजगारी नियंत्रित करु न शकलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात जनतेत प्रचंड चीड आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. महाविकास आघाडी मजबूत असून केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Uddhav Thackeray : जीव देण्यापेक्षा घेणारी माणसं तयार होत आहेत; ठाकरेंकडून भीती व्यक्त

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन, दादर येथे पार पडली. या बैठकीला केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष मधूसुदन मिस्त्री, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोवा, दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, AICC चे सचिव सोनल पटेल, आशिष दुआ, रामकिसन ओझा, संजय दत्त, हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अस्लम शेख, के. सी. पाडवी, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, माजी खासदार संजय निरुपम, आमदार भाई जगताप, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -