घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : जीव देण्यापेक्षा घेणारी माणसं तयार होत आहेत; ठाकरेंकडून भीती...

Uddhav Thackeray : जीव देण्यापेक्षा घेणारी माणसं तयार होत आहेत; ठाकरेंकडून भीती व्यक्त

Subscribe

बुलढाणा : उद्धव ठाकरे हे सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी चिखली येथे जनसंवाद मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जीव देण्यापेक्षा घेणारी माणसं तयार होत आहेत अशी भीती व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. (People are being created who take life rather than give it Fear expressed by Uddhav Thackeray)

हेही वाचा – Uddhav Thackeray : गद्दारांना पन्नास खोक्यांचा हमीभाव, पण…; शेतकरी प्रश्नांवर ठाकरेंचा संताप

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, या देशात जिवाला जीव देणारी माणसं आता राहिलेली नाही आहे, तर जीव घेणारी माणसं तयार होत आहेत का? अशी भीती वाटू लागली आहे. असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, हल्ली मी बघतोय ही अशी विराट गर्दी व्हावी यासाठी लोकांना बिर्याणी मागवावी लागते. मग लोकं बिर्याणीवर ताव मारतात आणि निघून जातात. पण शिवसेनेला तसं करावं लागत नाही. आम्हाला बिर्याणी वाटायची गरज लागत नाहीत.

मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. पण आता प्रेम करणारी माणसं मिळत नाही. शिवसेनेने ज्यांना मोठं केलं ती माणसं निघून गेली. पण ज्यांनी त्यांना मोठं केलं त्या माणसांना बघायला मी याठिकाणी आलो आहे. लोकांचं प्रेमाचं जे ऐश्वर्य आहे ते त्या गद्दारांच्या नशीबात नाही. शिवसेनेचं धनुष्यबाण चोरलं, पक्षाचं नाव चोरलं, पण आता ते त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसू शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर केली.

- Advertisement -

हेही वाचा – Nana Patole : आतंकवादी असल्याप्रमाणे शेतकऱ्यांवर गोळीबार काय करता? पटोले यांचा संतप्त सवाल

अन्नातून विषबाधेच्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बुलढाणा, हिंगोली, नंदुरबार येथील अन्नविषबाधेची घटना दुर्दैवी आहे. मुद्दाम केलं का घातपात होता, अशी चर्चा आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी श्रीसदस्यांचे बळी गेले. कंत्राटदाराला करोडो रुपये दिले. करोडो रुपये देऊन कंत्राटदाराचं पोट भरलं, पण करोडो रुपये खाल्ल्यानंतर कंत्राटदाराने उन्हातान्ह्यात जमलेल्या लोकांसाठी काहीच सोय केली नाही. याचा तपास अ्दायप सरकारने केलेला नाही.

आता विषबाधा झाल्यावर उपचारासाठी डॉक्टर नव्हते, हे आपलं सरकार? बुलढाण्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण सरकार काय करते आहे? असे सवाल करत काही दिवसांपूर्वी अवकाळीचा पाऊस पडला, आपत्ती आली. पण आपलं सरकार असतानाही आपत्ती आली. त्यावेळेला लोकांना मदत मिळाली. दोन लाखांपर्यंतची कर्ज माफ करायची योजना राबवली होती. त्यामुळे मैदानात येऊन लोकांमध्ये जाऊन विचारायला पाहिजे कुणाचं सरकार आवडलं. होऊन जाऊ दे सामना, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -