घरमुंबईमुंबईकरांनो सावधान! दादर, परळ, भायखळा, गोरेगावमध्ये दूषित पाणीपुरवठा

मुंबईकरांनो सावधान! दादर, परळ, भायखळा, गोरेगावमध्ये दूषित पाणीपुरवठा

Subscribe

पावसाळ्यात बऱ्याच भागात दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे कित्येकदा समोर आले आहे. मात्र आता मुंबईतील काही भागात जसे की, दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बातमी मुंबईकरांना सावध करणारी असली तरी चिंता वाढवणारी देखील तितकीच आहे हे नक्की. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाचा अहवाल जाहीर झाला असून त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

या अहवालातून असे समोर आले की, जुन्या आणि खराब पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे पाण्याच्या दूषितेत वाढ झाली आहे. या निरीक्षणातून असे सांगितले जात आहे की, होणाऱ्या दूषित पाण्यामुळे अतिसारासारखे आजार होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल २०२० च्या आकडेवारीनुसार, दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड यासारख्या भागात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या दूषिततेत वाढ झाल्याची नोंद केली गेली आहे.

- Advertisement -

मुंबई सारख्या मोठ्या शहराला रोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. २७ सेवा जलाशय आहेत ज्यातून पाणी गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि झोपडपट्ट्यांना पुरवले जाते. मुंबईत ४ लाखांहून अधिक मीटरचे पाणी कनेक्शन आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत नागरी संस्थेने तपासलेल्या एकूण २९ हजार ५१ पाण्याच्या नमुन्यांपैकी २७५ – ०.९४ टक्के इतके दूषित पाणी आढळले. पाण्याच्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषण हे ३.४ टक्के दादर, धारावी जी-उत्तर प्रभागमध्ये आढळले. त्यानंतर २.४ टक्के पी -दक्षिण गोरेगाव, टी वॉर्ड मुलुंडमध्ये २.३ टक्के आणि एफ-उत्तर सायन, माटुंगामध्ये २.२ टक्के इतके दूषित आढळले आहे.

चाचणीसाठी गोळा केलेल्या एकूण पाण्याच्या नमुन्यांपैकी २७५ मध्ये ई-कोलाय जीवाणूंची उपस्थिती दिसून आली. ज्यामुळे अतिसार आणि पेचिशसारखे आजार होऊ शकतात. मानकांनुसार, पिण्याचे पाणी ई-कोली मुक्त असावे. दूषित पाणी खराब झालेल्या किंवा जुन्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे झाले असावे असे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.


अमरिंदर सिंह यांचे हायकमांडला चॅलेंज, पद सोडण्यासही दिला नकार
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -