घरताज्या घडामोडीआग्रीपाडा येथील अनाथाश्रमातील १६ मुलांसह २२ जणांना कोरोनाची बाधा

आग्रीपाडा येथील अनाथाश्रमातील १६ मुलांसह २२ जणांना कोरोनाची बाधा

Subscribe

अनाथाश्रम पालिकेकडून 'सील'

मुंबई सेंट्रल,आग्रीपाडा (agripada) येथील ‘सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूल’ (St. Joseph Boarding School Orphanage) या मुलींच्या अनाथाश्रम शाळेतील १६ मुलींना व ६ महिला कर्मचाऱ्यांना असे एकूण २२ जणांना कोविडची बाधा (Children Covid positive) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वृत्ताने मुंबईत खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेने तात्काळ या अनाथाश्रम शाळेला सील ठोकले आहे. पालिका आरोग्य खात्याने या अनाथाश्रमातील ९५ जणांच्या कोविड चाचण्या केल्या असून त्यापैकी २२ जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या २२ जणांमध्ये १२ वर्षाखालील ४ मुलांचा, तर १२ – १८ वयोगटातील १२ जणांचा आणि ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

- Advertisement -

या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने १२ वर्षाखालील ४ मुलांना नायर रुग्णालयातील कोविड कक्षात तर उर्वरित १८ जणांना भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रूडस या कोविड जंबो सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, या भायखळा,आग्रीपाडा येथील ‘सेंट जोसेफ
बोर्डिंग स्कूल’ या अनाथाश्रम शाळेतील दोघांना कोविडची बाधा झाल्याचे २३ ऑगस्ट रोजी पालिकेच्या दवाखान्यात वैद्यकीय तपासणी दरम्यान आढळून आले.

त्यानंतर पालिका आरोग्य विभागाने २४ ऑगस्ट रोजी या अनाथाश्रम शाळेत वैद्यकीय तपासणी शिबीर घेऊन तेथील ९५ मुले, कर्मचारी, शिक्षक आदींची आरटीपीसीआर चाचणी केली. ३५ ऑगस्ट रोजी चाचणी अहवालात २२ जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले. या २२ जणांमध्ये, १२ वर्षांखालील ४ मुलांचा समावेश आहे. तर १२ – १८ वयोगटातील १२ जणांचा आणि ६ कर्मचार्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

या सर्व घटनाप्रकारामुळे या परिसरात एकाच खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर कार्यवाही करीत ४ लहान मुलांना नायर रुग्णालयात तर उर्वरित १८ जणांना भायखळा येथील पालिकेच्या रिचर्डसन अँड क्रूडस या कोविड जंबो सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतरांना अनाथाश्रमातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांकडून, कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्याचा लहान मुलांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता या गंभीर घटनाप्रकारामुळे लहान मुलांबाबत पालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे समजते.


हेही वाचा – कांदिवली कोरोनाचा हॉटस्पॉट, एकाच सोसायटीत १७ जण पॉझीटीव्ह, सोसायटी सील

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -