घरताज्या घडामोडीकांदिवली कोरोनाचा हॉटस्पॉट, एकाच सोसायटीत १७ जण पॉझीटीव्ह, सोसायटी सील

कांदिवली कोरोनाचा हॉटस्पॉट, एकाच सोसायटीत १७ जण पॉझीटीव्ह, सोसायटी सील

Subscribe

कांदिवलीतील इमारतींमध्ये कोरोनाबरोबरच पाच डेल्टा प्लस रुग्णही आढळले आहेत. यामुळे सोसायटीला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलं आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर कोरोनाचा हॉटस्पॉट झालं आहे.  येधील वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री या सोसायटीत १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सोसायटी सील करण्यात आली आहे. तसेच कांदिवलीतील इमारतींमध्ये कोरोनाबरोबरच पाच डेल्टा प्लस रुग्णही आढळले आहेत. यामुळे सोसायटीला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलं आहे.  यामुळे महापालिका सर्तक झाली असून कांदिवलीतील नागरिकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महावीर नगर मधील सोसायटीत आढळलेल्या १७ रुग्णांपैकी १० रुग्ण बरे झाले असून सात जणांवर उपचार सुरू आहेत. तर दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या सोसायटीत १२५ सदस्य असून नियमित कोरोनाचे नियम पाळले जात आहेत. पण असे असतानाही १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याने इतर सदस्यही धास्तावले आहेत. तर गेल्या चार दिवसात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याचे सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले आहे. तसेच

- Advertisement -

याप्रकरणी आर दक्षिण प्रभागाच्या साहाय्यक महापालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले की मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यातच पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सणवाराला एकत्र येणे टाळले पाहीजे. असेही नांदेडकर यांनी सांगितले आहे.

मुंबईत पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहानमुलांना असल्याने महानगरपालिकेने रुग्णालयही सज्ज केली आहेत. पण असे असले तरी तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचा धोका हा सामान्य व्यक्तींनाही असणार आहे. यामुळे महापालिकेतर्फे , झोपडपट्टी परिसराबरोबरच अरुंद् गल्ल्या, सार्वजनिक शौचालये, चाळी येथे पुन्हा सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -