घरCORONA UPDATECoronaVirus: 'त्या' ३३ विद्यार्थ्यांची करोना चाचणी निगेटिव्ह; एकाला शोधण्यायााठी शर्थीचे प्रयत्न

CoronaVirus: ‘त्या’ ३३ विद्यार्थ्यांची करोना चाचणी निगेटिव्ह; एकाला शोधण्यायााठी शर्थीचे प्रयत्न

Subscribe

दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याला दुबईहून आलेल्या वडिलांकडून करोनाची लागण

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली होती. त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या ३५ पैकी ३३ विद्यार्थ्यांच्या आणि नऊ शिक्षकांच्या करोना चाचणी निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याला दुबईहून आलेल्या वडिलांकडून करोनाची लागण झाल्याचे २३ मार्चला उघडकीस आले. त्यापूर्वी २१ मार्चला त्याने परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली होती. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेली परीक्षा केंद्रावरील ३५ विद्यार्थी आणि परिक्षकांसह विविध कारणाने त्या वर्गाशी संबंध आलेल्या नऊ शिक्षकांना करोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वर्गातील ३५ विद्यार्थी व नऊ शिक्षकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बाधित विद्यार्थी वगळता परीक्षा केंद्रावरील ३३ विद्यार्थी व नऊ शिक्षकांचा शोध घेऊन त्यांची तातडीने करोना चाचणी करण्यात आली. चाचणी केलेल्या सर्व विद्यार्थी व नऊ शिक्षकांची चाचणी निगेटिव्ह आल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

आणखी एका विद्यार्थ्याचा शोध सुरू

दरम्यान ३५ पैकी एक विद्यार्थी उशिरा सापडल्याने त्याची तपासणी सुरू आहे तर आणखी एका विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तो विद्यार्थी अद्याप सापडला नसल्याने त्याची चाचणी अद्याप होऊ शकलेली नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.


CoronaVirus – राज्यात रुग्णांमध्ये वाढ, १९३ जाणांना करोनाची लागण!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -