घरCORONA UPDATECoronaEffect: एसटीचा अजब कारभार; अधिकारी तुपाशी, कर्मचारी उपाशी!

CoronaEffect: एसटीचा अजब कारभार; अधिकारी तुपाशी, कर्मचारी उपाशी!

Subscribe

कॉंग्रेसकडून महामंडळावर भेदभावचा आरोप

एसटी कामगारांना प्रत्येक महिन्यात ७ तारखेला वेतन मिळते. मात्र यावेळी कोरोनामुळे या वेतनासाठी विलंब झाला आहे. मात्र असं असलं तरीही एसटीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेतन मिळाले आहे. ज्या चालक , वाहक , यांत्रिकि व अन्य कर्मचारी यांच्या पायावर एसटी उभी आहे. त्यांना मात्र अद्याप वेतन मिळालेले नाही. हा भेदभाव असून वेतन मिळण्यास विलंब होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली पाहिजे,  अशी मागणी एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.

कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.  देशभरात २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. अश्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असून फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई,  ठाणे,  पालघर येथील एसटीच्या ३०० बसेस धावत आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या या कठीण दिवसातही चालक आणि वाहक आपली निस्वार्थ सेवा देत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांना तात्काळ वेतन देणे गरजेचे आहे. मात्र ज्या चालक , वाहक , यांत्रिकि व अन्य कर्मचारी यांच्या पायावर एसटी उभी आहे. त्याना वेतन मिळालेले नाही. एसटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेतन मिळाले आहे. त्यामुळे कामगार संघटना संतापल्या आहेत.

एसटी महामंडळ आर्थिक संकटात

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी एसटी महामंडळाने सवलतीचे ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने पैशाची पूर्तता केली नाही. तसेच महामंडळाचे पुरवठादाराकची बीलं थाबली आहेत. तसेच भाडेतत्वात घेतलेल्या शिवशाही आणि स्वच्छतेचे कोट्यवधी रुपयांचे बिल थकीत पडून आहे. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहेत. एसटी महामंडळ आगोदरच ५ हजार कोटीच्या तोट्यात आहेत. त्यात २१ दिवसांच्या लॉक डाऊनमुळे एसटी महामंडळाला दररोज २८ कोटींचा आर्थिक फटका बसतो आहे. तर २१ दिवसांत एसटी महामंडळाला ६०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाचा तोटा हा ६ हजार कोटीच्या घरात पोहचणार आहेत.

- Advertisement -

अधिकाऱ्यांवर करा कारवाई

प्रत्येक महिन्याला २४ ते ३१ तारखेपर्यत एसटी प्रवासी महसूल हा एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी वापरण्यात येत होता. हेच सूत्र एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी एसटी महामंडळ वापरते आले आहे. मात्र कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे आर्थिक गणित बिघडले आहे. इतकेच नव्हे तर जर लॉक डाऊनमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे  आर्थिक बिघडणार असल्याची माहिती एसटीचा अधिकाऱयांना असताना त्यांनी  प्रयत्न करायला हवे होते. मात्र तो करताना दिसून येत नाही. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी यावेळी भाई जगताप यांनी केली आहेत.

एसटी मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याना वेतन मिळाले आहे. ज्या चालक , वाहक , यांत्रिकि व अन्य कर्मचारी यांच्या पायावर एसटी महामंडळ उभी आहे. त्यांना या कठीण परिस्थितीत  वेतन मिळालेले नाही. हा भेदभाव असून वेतन मिळण्यास विलंब होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

भाई जगताप , अध्यक्ष , महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस

 

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -