घरमुंबईCoronaVirus: कोरोना बाधित क्षेत्र परिसरात रस्त्यावरील भाजी विक्रीवर बंदी

CoronaVirus: कोरोना बाधित क्षेत्र परिसरात रस्त्यावरील भाजी विक्रीवर बंदी

Subscribe

नागरिक काळजी घेत नसल्याने नाइलाजाने मंगळवारपासून या परिसरातील भाजी विक्रेत्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आलेल्या इमारतींसह परिसरांमध्ये महापालिकेच्यावतीने बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते. परंतु या बाधित क्षेत्र परिसरातील भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी आणि त्यापासून नागरिकांमध्ये होणारा संसर्ग लक्षात घेता यापुढे बाधित क्षेत्र परिसरात भाजी विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे बाधित क्षेत्र परिसरात भाजी विक्रेत्यांना आता बसू न देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.

मुंबईतील ज्या परिसरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे, त्या परिसराला महापालिकेच्यावतीने बाधित क्षेत्र जाहीर करून नागरिकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध घातले जातात मुंबईत अशाप्रकारे एकूण २४१ बाधित क्षेत्र महापालिकेने जाहीर केलेली आहेत. त्यामुळे अशा बाधित क्षेत्रांमधील नागरिकांना बाहेर पडण्यास तसेच बाहेरच्यांना त्याठिकाणी जाण्यास महापालिका व पोलिस आदींच्या माध्यमातून मज्जाव करण्यात येतो. या बाधित क्षेत्रांमधील नागरिकांची कोणतीही गैरसोय होवू नये म्हणून तसेच त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू याच परिसरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत केले जाते. त्यानुसार आतापर्यंत दररोज सकाळी भाजी विक्रेत्याच्या माध्यमातून या परिसरात भाजी उपलब्ध करून देण्यात येते.

- Advertisement -

मात्र, ही भाजी खरेदी करण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक एकाच वेळी गर्दी करतात. तसेच आवश्यक ते अंतर ठेवण्याची व एकत्र न येण्याची वारंवार सूचना करुनही महापालिकेच्या व पोलिसांच्या सुचनेचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

एकाच वेळी अनेक व्यक्ती भाजी खरेदी करण्यासाठी येत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन व वारंवार सुचना दिल्यानंतरही परिसरातील नागरिकांकडून त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे नागरिक काळजी घेत नसल्याची बाबही लक्षात घेऊन नाइलाजाने मंगळवारपासून या परिसरातील भाजी विक्रेत्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

महापालिकेच्या नावासह बोधचिन्हाचा गैरवापर

कोरोना संदर्भात महापालिकेच्यावतीने कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेचे डॉक्टर्स, परिचारिका व विविध खात्यांचे कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत आहेत. मात्र काही समाजविघातक प्रवृत्ती याचा गैरफायदा घेत महापालिकेचे बोधचिन्ह व नाव अनधिकृतपणे वापरून देणग्या गोळा करत सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे जर कोणी आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले.


लॉकडाऊनमध्ये सव्वाचार लाखांची गावठी दारू जप्त
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -